डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीरातून मुतखड्याऐवजी काढली किडनी, त्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 07:58 AM2022-02-14T07:58:39+5:302022-02-14T07:59:21+5:30
Crime News: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुतखड्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या तरुणाची किडनी काढण्यात आली. उपचारानंतर दहा वर्षांनंतर युवकाच्या पोटात अचानक वेदना जाणवल्या.
रायपूर - छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुतखड्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या तरुणाची किडनी काढण्यात आली. उपचारानंतर दहा वर्षांनंतर युवकाच्या पोटात अचानक वेदना जाणवल्या. तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या तरुणाला त्याची एक किडनी काढण्यात आल्याचे समजले, तेव्हा त्याला धक्का बसला. मग या तरुणाने अन्य माध्यमातून त्यातूनही त्याची किडनी काढण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर रामपूर पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तपासामध्ये आरोपी डॉक्टरची पदवी खोटी असल्याचे समोर आले आहे.
कोरबा येथील रजगामार रोड येथे संचालित सृष्टी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरकडून संतोष गुप्ता याने दहा वर्षांपूर्वी मुतखड्यावर उपचार केला होता. मात्र मुतखडा काढण्याऐवजी डॉक्टरांनी त्याची एक किडनी काढून घेतली. पीडिताने याबाबतची तक्रार आता आरोग्य विभागाकडे केली आहे. तपासामध्ये ही तक्रार योग्य असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बनावट डॉक्टरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, रामपूर चौकी पोलिसांनी बनावट डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष गुप्ताने मुतखड्याचा त्रास झाल्यावर १० वर्षांपूर्वी सृष्टी ऑफ मेडिकल इन्स्टिट्युटमधील डॉक्टर एस.एन. यादव यांच्याकडून उपचार करवून घेतले होते. मात्र येथे डॉक्टरांनी त्याचा मुतखडा काढण्याऐवजी किडनी काढली. जेव्हा पीडित संतोष गुप्ता याला ही बाब समजली तेव्हा त्याला धक्का बसला. या प्रकरणाच्या तपासामध्ये डॉ. एस. एन. यादव यांनी बेफिकीरी दाखवल्याचे समोर झाले. दरम्यान हे डॉक्टर कुठल्याही पदवीविना पदावर बसल्याचे उघड झाले आहेत.