कुत्रा भुंकल्याने भडकला, शेपूट पकडून श्वानाला फेकला तर मालकाला लोखंडी रॉडनं धोपटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:05 PM2022-07-04T14:05:26+5:302022-07-04T14:05:52+5:30
A Man Injured His Neighbors While Their Pet Dog Barked : पीडितेने पश्चिम विहार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे पाळीव कुत्र्याने भुंकल्याने शेजारी राहणारा तरुण इतका संतप्त झाला की, त्याने लोखंडी रॉडने हल्ला करून तिघांना जखमी केले. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने पश्चिम विहार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या भांडणात शेजाऱ्याने आधी कुत्र्याला शेपटीने पकडून जमिनीवर आपटलं. कुत्र्याच्या मालकाने विरोध केला असता आरोपीने कुटुंबातील तीन सदस्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी धरमवीर सिंग दहिया हा पश्चिम विहार ए ब्लॉक जनता फ्लॅटमध्ये राहतो.
#WATCH | Delhi: 3 members of a family&their pet dog injured after being hit by a neighbor with an iron rod in Paschim Vihar. It happened after the dog allegedly barked at him. FIR lodged.
— ANI (@ANI) July 4, 2022
Injured stable. Dog's owner says it has a clot in its head & will be taken to veterinarian. pic.twitter.com/YAa1QdduzB
रक्षित नावाचा पीडित आपल्या कुटुंबासोबत पश्चिम विहार परिसरात राहते. त्यांच्या शेजारच्या गल्लीत राहणारा धरमवीर दहिया हा रविवारी सकाळी घरासमोरून जात होता. यादरम्यान त्यांचा पाळीव कुत्रा घराच्या गेटवर बसला होता. धरमवीर तिथे पोहोचताच रक्षितच्या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे धरमवीर चांगलाच संतापला. त्याने रक्षितच्या पाळीव कुत्र्याची शेपटी पकडून जमिनीवर आपटलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे पाहून रक्षित बाहेर आला आणि धर्मवीरला आपल्या कुत्र्यास मारहाण करण्यापासून रोखू लागला. रक्षितचा आरोप आहे की, रागाच्या भरात धरमवीरने आपल्या कुत्र्याला वीट मारली जी रक्षितला लागली, त्यानंतर धरमवीर घरी गेला आणि लोखंडी रॉड घेऊन परत आला. अशा वेळी रक्षितचे मामा आणि मामाही घराबाहेर पडले. त्यानंतर धरमवीरने कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला आणि नंतर रक्षितच्या मामावर हल्ला केला, त्यामुळे तो जागीच जखमी होऊन पडला. या घटनेत त्याचा मामा हेमंत आणि मामा यशोदा जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.