मद्यधुंद तरुणाने वृद्ध आईला मारहाण केली, जीभही कापली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 09:55 PM2022-04-07T21:55:58+5:302022-04-07T21:59:42+5:30

Crime News : महिलेला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

The drunken youth beat the old mother, bit her tongue and ... | मद्यधुंद तरुणाने वृद्ध आईला मारहाण केली, जीभही कापली आणि...

मद्यधुंद तरुणाने वृद्ध आईला मारहाण केली, जीभही कापली आणि...

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमधील महोबा जिल्ह्यात एका मद्यधुंद व्यक्तीने आईला मारहाण करून तिची जीभ कापली. तिला वाचवण्यासाठी आलेल्या वडिलांनाही मारहाण केली. महिलेला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

हे प्रकरण जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बसोरा गावातील आहे. येथे चंद्राबली आणि त्याची पत्नी रामप्यारी आपला मुलगा चंद्रशेखरच्या कुकृत्यांमुळे त्रासले होते. आरोपी चंद्रशेखर अनेकदा दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आईला मारहाण केली, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिला बेडवरून उठताही येत नव्हते.

यानंतर चंद्रशेखरने तिला स्वयंपाक करायला सांगितला. पण तिच्या दुखापतीमुळे ती काम करू शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या चंद्रशेखरने तिला मारहाण करून गळा आवळून खून करण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी चंद्रशेखरवर जणू काही राक्षस स्वार झाला होता, त्याने त्या महिलेची जीभही कापली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वडील चंद्रबाली यांनाही त्याने मारहाण केली.

डॉक्टरांनी झाशीला रेफर केले, वाटेतच मृत्यू झाला
 
कसेबसे चंद्राबलीने आपल्या पत्नीला चंद्रशेखरपासून वाचवले आणि दवाखान्यात धाव घेतली. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, तेथून डॉक्टरांनी झाशीला रेफर केले. मात्र वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. महोबाचे सीओ सदर राम प्रवेश राय यांनी सांगितले की, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: The drunken youth beat the old mother, bit her tongue and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.