मोठ्या भावाने आईला खडसावले; लहान्याची धारदार शस्त्राने मोठ्याला मारहाण
By कुमार बडदे | Updated: May 13, 2023 15:15 IST2023-05-13T15:14:31+5:302023-05-13T15:15:21+5:30
भावाने आईला खडसावल्याचा राग मनात धरुन त्याचा भाऊ अंजर (वय १८) याने शुक्रवारी रात्री अशद यांच्या छातीवर धारदार शस्त्रःने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मोठ्या भावाने आईला खडसावले; लहान्याची धारदार शस्त्राने मोठ्याला मारहाण
कुमार बडदे
मुंब्रा - मोठ्या भावाने आईला खडसावले म्हणून संतप्त होऊन त्याच्यावर धारदार शस्त्रःने वार करुन जीवघेणा हल्ला करणाऱ्या लहान भावाला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली.शिळफाटा भागातील म्हापे रोड परीसरात रहात असलेले मो.अशद शेख (वय ३०) यांची पत्नी आणि त्यांच्या आईमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी शेख यांनी आईला खडसावले होते.
भावाने आईला खडसावल्याचा राग मनात धरुन त्याचा भाऊ अंजर (वय १८) याने शुक्रवारी रात्री अशद यांच्या छातीवर धारदार शस्त्रःने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात जखमी झालेल्या अशद याना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखाल करण्यात आले.याप्रकरणी आशद यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरुन अंजर याला पोलिसांनी अटक केली असून,याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस करत आहेत.