Shraddha Walker Murder Case: आफताबचे कुटुंबीय १५ दिवसांपूर्वीच अज्ञातस्थळी; वसईतून झाले गायब, घर सोडताना म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 04:40 PM2022-11-16T16:40:49+5:302022-11-16T16:48:05+5:30
Shraddha Walker Murder Case: आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते.
Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
श्रद्धाचा खून करताना काहीच वाटलं नाही?; पोलिसांच्या प्रश्नावर आफताबच धक्कादायक उत्तर
आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच आफताबचे त्यांनी घर रिकामे करुन मुंबईत शिफ्ट होतो, असं सांगून निघून गेल्याची माहिती या सोसायटीच्या आदिल खान या पदाधिकाऱ्याने लोकमतला दिली. मात्र आपल्या मुलाने मोठा गुन्हा केल्याचे कळल्यानंतर आपले राहण्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय आफताबच्या पालकांनी घेतला नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
'आमची श्रद्धा तशी नव्हतीच'; वडिलांसह अन् मित्रांचाही दावा, पोलिसांसह सगळेच हौरण!
आफताबच्या कुटुंबियांनी १५ दिवसांपूर्वी जेव्हा वसईतले घर रिकामे केले, त्यानंतर काही वस्तू घरात राहिल्या होत्या. त्या नेण्यासाठी दोन दिवसांनी वसईतील घरी आफताब येऊन गेल्याची खळबळजनक माहिती सोसायटीचे पदाधिकारी आदिल खान यांनी दिली. घर रिकामे करण्याचे विचारले असता, आफताबच्या लहान भावाला मुंबईत नोकरी लागली. त्यामुळे येण्याजाण्याचा त्रास वाचण्यासाठी आम्ही मुंबईत जातोय, असं आफताबच्या वडीलांनी सांगितलं होतं.
'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!
दरम्यान, श्रद्धा आणि आफताबची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहू लागले. दोघंही वसई येथील रहिवाशी असल्याने त्यांचं जास्त जुळून आलं. दोघंही जास्त जवळीक येण्याचं हेच एक कारण ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे ३५ तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहितीही त्याने दिली आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले-
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे.
दोन स्टेटमेंटमध्ये तफावत-
आफताब आणि त्याच्या आईला माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या गायबप्रकरणी पोलिस ठाण्यात ३ नोव्हेंबरला बोलावले होते. आरोपी आफताब याचे ३ नोव्हेंबर आणि त्याआधी दोन वेळा स्टेटमेंट घेतले. पण दोन्ही स्टेटमेंटमध्ये तफावत आढळल्याने माणिकपूर पोलिसांना संशय आल्याने ७ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"