धक्कादायक! ८ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन बापानेच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:34 PM2023-09-12T20:34:41+5:302023-09-12T20:35:05+5:30

पहूर : आशा वर्करमुळे उघडकीस आला प्रकार

The father killed the 8-day-old girl by putting tobacco in her mouth | धक्कादायक! ८ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन बापानेच केली हत्या

धक्कादायक! ८ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन बापानेच केली हत्या

googlenewsNext

पहूर (जि. जळगाव) : आधी दोन मुली त्यात तिसरीही मुलगी झाल्याने बापानेच आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केली. एवढेच नाही मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि बापाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार हरिनगर तांडा, ता. जामनेर येथे रविवारी घडला.

गोकुळ गोटीराम जाधव (३०) असे या नराधम बापाचे नाव आहे. आरोग्य विभागच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. रविवार, १० रोजी चिमुरडीची गोकुळने हत्या केली.
  
आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावात पोहाेचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली. तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले.

Web Title: The father killed the 8-day-old girl by putting tobacco in her mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.