ह्रदयद्रावक... कर्जबाजारीपणामुळे बापानेच दोन वर्षांच्या चिमुकलीला मिठीत दाबून ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:47 AM2022-11-29T05:47:58+5:302022-11-29T05:49:05+5:30
म्हणाला, कर्ज आहे, पोट भरायला पैसे नव्हते
लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू : येथे एका टेक्निशियनने आपल्या २ वर्षाच्या मुलीची हत्या केली. मुलीला खायला घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते, आपण कर्जबाजारी होतो, त्यामुळे मुलीला मारले असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तो वाचला.
राहुल परमार असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा गुजरातचा असून दोन वर्षांपूर्वी पत्नी भव्या सोबत येथे गेला होता. मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले. त्याने तलावाजवळील दुकानातून मुलीसाठी चॉकलेट आणि बिस्किटे खरेदी केली. पण मुलीला दुपारपासून भूक लागली होती म्हणून ती रडतच राहिली. मुलीला दुसरे काही खायला घालण्यासाठी राहुलकडे पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने मुलीसह मरण्याचा निर्णय घेतला.
खेळ खेळला अन्आधी तो बराच वेळ मुलीसोबत गेम खेळत राहिला. मग तिला मिठीत घेत गुदमरून मारून टाकत तिच्या शरीरासह तलावात उडी मारली, मात्र तो वाचला. यानंतर त्याने ट्रेनला धडकून जीव देण्याचा प्रयत्न केला. यातही तो वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गेल्या ६ महिन्यांपासून बेरोजगार होता आणि त्याला बिटकॉईन व्यवसायातही मोठे नुकसान झाले होते.