चौदा वर्षाच्या मुलाचा मारेकरी निघाला बापच, आईने दिली फिर्याद!
By संताजी शिंदे | Published: January 29, 2024 02:57 PM2024-01-29T14:57:09+5:302024-01-29T15:04:32+5:30
विजय सिद्राम बट्टू (वय ३३ रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.
सोलापूर : संशयास्पद मृत्यू झालेल्या १४ वर्षीय मुलाचा बातच त्याचा मारेकरी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मुलाबाबत येणाऱ्या सततच्या तक्रारीला कंटाळून हे कृत्य केल्याची फिर्याद आईने जाेडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे.
विजय सिद्राम बट्टू (वय ३३ रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. मयत विशाल विजय बट्टू हा १४ वर्षाचा मुलगा १३ जानेवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेला होता. आवघ्या दिड तासात ८.३० वाजता तो तुळजापूर रोडवरी नाल्याजवळ बेशुद्ध आवस्थेत आढळून आला होता. जोडभावी पेठ पोलिसांनी त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विशाल बट्टू याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजून येत नव्हते. शासकीय रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढे पोलिसांनी तपास केला असता, विशाल बट्टू हा शाळेत खोड्या करत होता. घरात सतत मोबाईल पहात होता. सततच्या तक्रारीचा राग मनात धरून वडिल विजय बट्टू याने मुलगा विशाल याला मोटारसायकलवर बसवून तुळजापूर रोडवर नेले. तेथे त्याला शितपेयामध्ये विषारी पावडर मिसळून दिले. शितपेय पिल्यामुळे विशालचा मृत्यू झाला अशी फिर्याद मुलाची आई किर्ती विजय बट्टू (वय ३४) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक जगताप करीत आहेत.