खोपट येथील पुंजानी इस्टेटमधील टीव्हीएसच्या सर्विस सेंटरला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:52 IST2022-02-16T20:52:09+5:302022-02-16T20:52:35+5:30
Thane Fire News : रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

खोपट येथील पुंजानी इस्टेटमधील टीव्हीएसच्या सर्विस सेंटरला लागली आग
ठाणे : खोपट परिसरातील एका दुचाकी कंपनीच्या स्पेअरस्पार्टच्या दुकानाला बुधवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली. या आगीत आतील वस्तूंचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
ठाणे पश्चिम येथील पुंजानी इस्टेट परिसरात एक दुचाकीचें स्पेअरस्पार्टचें दुकानआहे. या येथे बुधवारी सायंकाळी सात वाजून ३५मिनिटांनी अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनदलाकडून रात्री उशिरा आगीवर
नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.ही आग कशाने लागली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.