वृद्धेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अखेर गजाआड

By नितिन गव्हाळे | Published: June 2, 2024 09:44 PM2024-06-02T21:44:59+5:302024-06-02T21:45:12+5:30

बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई, आरोपी खामगाव तालुक्यात राहणारा

The fugitive accused of abusing an old woman is finally behind bars | वृद्धेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अखेर गजाआड

वृद्धेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अखेर गजाआड

अकोला: दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेऊन एका शेतात वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणारा फरार आरोपी युवकास अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी २ जून रोजी अटक केली आहे.

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाळंबी ता. जि. अकोला येथील एका वयोवृध्द महिलेच्या तक्रारीनुसार २८ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अकोला येथून एसटी बसने ग्राम कोळंबी फाट्यावर उतरली. तेथून खाजगी लक्झरी बसने दाळंबी येथे जाण्यास निघाली व दाळंबी गावाचे पुलाच्या अलीकडे वृद्ध महिला बसमधून खाली उतरली आणि तेथून पायि जात असताना समोरून दोन मोटारसायकलवर तिघे जण आले. एका मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या तोंडाला रूमाल बांधुन व एका मोटारसायकलवरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी वृद्ध महिलेस उचलून रोडचे बाजुचे निंबाच्या शेतात आणले व तोंडाला कापड बांधलेले दोन इसम तेथून निघून गेले. त्या ठिकाणी हजर असलेल्या तिसऱ्या युवकाने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर मारून टाकणार अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही.

नंतर आरोपी युवक वृद्धेला मारण्याकरीता दगड शोधत असता, वृद्ध महिला तेथून पळून गेली. दरम्यान तिला तिच्या गावातील धर्मा शिंदे व आणखी एक इसम दाळंबी गावाकडे पायी जाताना दिसले. यावेळी वृद्धेने त्यांना आपबिती सांगत, दोघांना आरोपीस पकडा असे म्हटले. गावातील दोघांनीही आरोपी युवकाचा पाठलाग केला. परंतु आरोपी मोटारसायकलवर पळून गेला. त्यानंतर गावातील इसमांनी वृद्धेला तिच्या सोडून दिले. दुसऱ्या दिवशी वृद्धेने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. घटनेचे गांर्भीर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. वेगवेगळे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी राहूल अर्जुन मोरे(२४) रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा याला ताब्यात घेवूनचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याने एकट्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बोरगावचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, एएसआय अरूण गोपनारायण, पोहवा योगेश काटकर, गिरीष विर, नारायण शिंदे, सचिन सोनटक्के, नितीन पाटील, सुदीप राऊत, संदीप पवार, अविनाश पाचपोर, रवि खंडारे, अब्दुल माजिद, वसीम शेख, प्रशांत केदारे,गोपाल ठोंबरे,एएसआय गोविंदा कुळकर्णी यांनी केली आहे.
 

Web Title: The fugitive accused of abusing an old woman is finally behind bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.