तरूणीने लिंकवर फॉर्म भरला अन् १ लाख २४ हजार ठगाच्या खात्यात...

By सागर दुबे | Published: April 20, 2023 03:27 PM2023-04-20T15:27:47+5:302023-04-20T15:28:04+5:30

शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती विठ्ठल तायडे या तरुणीला तब्बल १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे.

The girl filled the form on the link and 1 lakh 24 thousand in the thug's account... | तरूणीने लिंकवर फॉर्म भरला अन् १ लाख २४ हजार ठगाच्या खात्यात...

तरूणीने लिंकवर फॉर्म भरला अन् १ लाख २४ हजार ठगाच्या खात्यात...

googlenewsNext

जळगाव : जळगावात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. फसवणुकीचे नवनवीन फंडे हे सायबर गुन्हेगार शोधत असतात. असाच एका नव्या पद्धतीने शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती विठ्ठल तायडे या तरुणीला तब्बल १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीच्या लिंकवर फॉर्म भरायला सांगून सायबर ठगाने तरूणीची फसवणूक केली आहे.

स्वाती तायडे ही तरूणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. १ एप्रिल रोजी तिने ऑनलाइन साडी बुक केली होती. ही साडी ३ एप्रिल रोजी बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीद्वारे मिळणार होती. पण, ७ एप्रिल तारीख येऊनही साडी मिळाली नाही. त्यामुळे तरूणीने कुरिअर कंपनीच्या संकेतस्थळावर साडीच्या डिलिव्हरी स्टेटस् चेक केले. त्यावेळी तिला डिलेव्हरी पेडींग दिसून आली म्हणून कुरिअर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने तरूणीला तुमचा पत्ता सापडत नसल्यामुळे पार्सल पेडींग दिसत असल्याचे सांगून कंपनीच्या लिंकवर जाऊन एक फॉर्म भरण्यास सांगितला. त्यानुसार तरूणीने संपूर्ण फॉर्म भरला.

बॅलेन्स तपासले, धक्काच बसला...
दरम्यान, फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटानंतर तरूणीला तिच्या खात्यातून पैसे कपातीचे मेसेज प्राप्त झाले. क्रेडीट कार्ड आणि बँक खात्यातून पैसे कपातीचा मेसेज आल्यानंतर तरूणीला शंका निर्माण झाली. तरूणीने ऑनलाइन खात्यातील रक्कम तपासल्यानंतर त्यातील रक्कम कमी झालेली दिसून आली. काही वेळानंतर पुन्हा तिने ऑनलाइन बॅलेन्स तपासल्यानंतर तब्बल १ लाख २४ हजार रूपये खात्यातून गायब झालेली दिसून आली. अखेर बुधवारी तिने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: The girl filled the form on the link and 1 lakh 24 thousand in the thug's account...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.