मुलगी दिवसभर फोनवर करायची चॅटिंग, वडिलांनी टाकले संपवून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:05 PM2022-04-07T18:05:02+5:302022-04-07T18:25:56+5:30
Horror Killing: अटक करण्यात आलेले वडील नूर मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी दिवसभर फोनवर चॅट करत असे. याला कंटाळून त्याने हा गुन्हा केला.
सोनीपत - हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील भदाना गावात खोट्या रुबाबामुळे वडिलांनी मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी वडिलांचे नाव नूर मोहम्मद आहे. ज्याने आपल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला. अटक करण्यात आलेले वडील नूर मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी दिवसभर फोनवर चॅट करत असे. याला कंटाळून त्याने हा गुन्हा केला. सोनीपत पोलीस आज अटक केलेल्या वडिलांना न्यायालयात हजर करणार आहेत.
या प्रकरणाचा तपास करणार्या एएसपी दीप्ती गर्ग यांनी सांगितले की, त्यांना भदाना गावात एका अल्पवयीन मुलीचा घरातच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांचा मृत्यू पायऱ्यांवरून पडल्याने झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मुलीचे पोस्टमार्टम केले असता तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.
वहिनीला कोल्ड ड्रिंक देऊन दिराने बनवला अश्लील व्हिडिओ अन् करत राहिला बलात्कार...
मला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे, पोलिसांना फोन करून मुलगी म्हणाली... मग?
भदाना गावातील घरात एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर सदर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी जिन्यांवरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांनी दिली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, याबाबत माहिती वडिलांना समजली आणि त्यानंतर वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला.