जंगलात नेऊन विद्यार्थिनीवर शाळेतीलच २ विद्यार्थ्यांनी केला गँगरेप, घराबाहेर पीडितेला सोडून आरोपींनी काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:10 PM2022-01-27T15:10:37+5:302022-01-27T15:12:17+5:30
Gangrape Case :पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
राजस्थानमधील डुंगरपूर येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी तिचे अपहरण करून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडल्याचा आरोप आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी बिछीवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
बाईकवरून जंगलात नेले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारी विद्यार्थिनी 24 जानेवारी रोजी याच शाळेत शिकणाऱ्या भावासोबत शाळेत गेली होती. जिथे दुपारी जेवणाच्या वेळी मुलगी बाहेर आली आणि याच दरम्यान बारावीत शिकणाऱ्या शाळेतील दोनच विद्यार्थ्यांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेले. जिथे तिच्यावर बलात्कार केला आणि जखमी अवस्थेत तिला घराबाहेर सोडून पळून गेले.
इयत्ता 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर आरोप
यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून बिछीवाडा पोलिसांनी दोन मुलांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली. डुंगरपूरचे डीएसपी राकेश कुमार शर्मा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली
या प्रकरणाची अधिक माहिती देताना डीएसपी राकेश कुमार शर्मा म्हणाले की, नववीच्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय मुलगी २४ जानेवारीला तिच्या भावासोबत शाळेत गेली होती. दुपारच्या जेवणाच्या वेळी शाळेच्या बाहेर आली. तेव्हा याच शाळेतील बारावीत शिकणाऱ्या दोन मुलांनी तिला धमकावून शाळेतून जंगलात नेले.