मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 08:33 PM2022-03-21T20:33:28+5:302022-03-21T20:34:04+5:30
Rape Case : मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पंजाबमधील लुधियाना येथे होळीच्या दिवशी दिवसाढवळ्या एका नऊ वर्षांच्या मुलीवर एक नराधमाने बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपीने मुलीला कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली. हा प्रकार उघडकीस येताच मुलीची आई घरी आली असता पीडित मुलीने सर्व माहिती आईला दिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस ठाणे विभाग दोनचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुले होळी खेळत होती. होळी खेळून मुले आली असता आरोपीने मुलीला सोबत नेले आणि तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. दुपारनंतर तिची नऊ वर्षांची मुलगी घरी आली आणि तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला त्याच्या खोलीत नेले, जिथे तो बूट बनवण्याचे काम करतो आणि दारूच्या नशेत मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दुष्कर्म! मृताच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं लाटणं, अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू