नवरदेवाचा नातेईवाईक म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने सगळ्यासमोरच घातल्या गोळ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:26 IST2025-02-17T16:25:40+5:302025-02-17T16:26:25+5:30
लग्नासाठी आला आणि जीव गमावून बसला, अशीच एक घटना समोर आली आहे. नवरदेवाच्या नातेवाईकाची नवरीच्या काकाने गोळ्या घालून हत्या केली.

नवरदेवाचा नातेईवाईक म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने सगळ्यासमोरच घातल्या गोळ्या!
लग्नासाठी आलेल्या सगळ्या वऱ्हाड्यांसमोर नवरीच्या काकाने नवरदेवाच्या एका नातेवाईकाला गोळ्याच घातल्या. विषय होता लग्नात तयार केलेल्या जेवणाचा. नवरदेवाच्या नातेवाईकाने जेवण व्यवस्थित झालेलं नाही म्हणून कूरबूर केली अन् नवरीच्या काकाने गावठी पिस्तूल काढलं आणि सगळ्यासमोर गोळी घातली. सनई चौघडे वाजत असलेल्या लग्नाच्या मंडपात रक्ताचा सडा पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील सहावरमध्ये ही घटना घडली आहे. सहावरचे डीएसपी शहिद नसरीन यांनी सांगितले की, हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. नवरीचे काका विजय कुमार यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटकही करण्यात आली आहे.
नवरीच्या काकाने केली हत्या, काय घडलं?
सहावरमधील रोशन नगर गावात ही घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अरूण कुमार आहे. ३७ वर्षीय अरुण कुमार हे नवरदेवाचा नातेवाईक होते आणि ते लग्नासाठी आला होता. नवरदेव हाथरसमधील सिखंदरोचा आहे. अरुण नवरदेवाचा भाऊ ललितसोबत होता.
लग्न लागल्यानंतर जेवणं झाली. त्यानंतर अरुण कुमार हे ललितला म्हणाले की, जेवण खराब आहे आणि व्यवस्थित शिजवलेलं नाही. हे नवरीचे काका विजय कुमार याने ऐकले. त्यानंतर त्यांचा अरुण कुमार यांच्यासोबत वाद सुरू झाला.
वाद विकोपाला गेला अन् गोळ्या घातल्या
बोलता बोलता वाद विकोपाला गेला आणि विजय कुमार यांनी सर्व वऱ्हाड्यांसमोर गावठी पिस्तुल काढून अरुण कुमार यांना गोळ्या घातल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासणी त्यांना मृत घोषित केले.
मयत अरुण कुमारच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडील पिस्तुलही जप्त केले आहे.