कृरतेचा कळस! प्रेयसीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून तरुणाची निघृण हत्या; वाचून तुमचाही थरकाप उडेल
By नितीन पंडित | Published: November 7, 2022 09:21 PM2022-11-07T21:21:33+5:302022-11-07T21:24:32+5:30
शहरातील फातमानगर परिसरातील रियाज हॉटेलमध्ये अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने डोळ्यावर आणि डोक्याच्या मधोमध खोल जखम करून, तसेच गुप्तांग कापून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली आहे.
भिवंडी - आपल्या प्रेमिकेवर हॉटेल व्यवसायिक तरुण प्रेम करीत असल्याच्या संशयातून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना भिवंडीत सोमवारी घडली. या हत्येनंतर गुन्हे शाखेने अवघ्या सात तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केले आहे. मोहमद समीमरजा अमीन खान (वय-२०) रा.रियाज हॉटेल, फातमानगर असे हत्या झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. तर मोहम्मद अमीर मोहम्मद अस्लम अन्सारी (वय २९ रा.फातमानगर) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील फातमानगर परिसरातील रियाज हॉटेलमध्ये अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने डोळ्यावर आणि डोक्याच्या मधोमध खोल जखम करून, तसेच गुप्तांग कापून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी मेहमुद अमीन नब्बा खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हत्या करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सपोनिरी विजय मोरे, प्रफुल्ल जाधव, धनराज केदार, पोउपनिरी, रमेश शिंगे, हनुमंत वाघमारे, सपोउनिरी रविंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, पोहवा सुनिल साळुंखे, मंगेश शिर्के, साबीर शेख,रंगनाथ पाटील, पोना सचिन जाधव, पोशि भावेश घरत, प्रशांत बर्वे,रोशन जाधव या पोलीस पथकाने सुरू केला होता.
गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद अमीर मोहम्मद अस्लम अन्सारी यास कामतघर परिसरातून ताब्यात घेत त्याच्या कडे कसून चौकशी केली असता त्याने हत्या झालेला युवक मित्र मोहंमद समीमरजा अमीन खान याचे आपल्या प्रेमीका सोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातुन त्याचा अत्यंत निघृण क्रूरतेने हत्या केल्याची कबुली दिली आहे. भिवंडी गुन्हे शाखेने हत्येच्या घटने नंतर कोणताही पुरावा नसताना अवघ्या सात तासात हत्या करणाऱ्याचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर आरोपीस पुढील कारवाई करीता शांतीनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.