मुंबईच्या उच्चभ्रू भागात वॉकिंगला गेलेल्या पत्नीवर पतीने केला चाकू हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:05 AM2023-07-31T09:05:10+5:302023-07-31T09:06:12+5:30

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यानं जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले

The husband attacked the wife who went for a walk in the Khar area of Mumbai | मुंबईच्या उच्चभ्रू भागात वॉकिंगला गेलेल्या पत्नीवर पतीने केला चाकू हल्ला

मुंबईच्या उच्चभ्रू भागात वॉकिंगला गेलेल्या पत्नीवर पतीने केला चाकू हल्ला

googlenewsNext

मुंबई – शहरातील खार परिसरात पतीने पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री उशिरा वॉकला गेलेल्या पत्नीवर पतीने हा हल्ला केला. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. या वादातूनच हा हल्ला झाल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या य महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटलं. या घटनेनंतर खार पोलिसांनी आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोप पती फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पथके नेमली आहेत. धारावी परिसरात हे जोडपे राहत होते. वैवाहिक वादामुळे पती-पत्नी दोघांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. रविवारी रात्री पती-पत्नी खार येथील परिसरात आमनेसामने आल्यानंतर पुन्हा हा वाद पेटला. रात्री ८.३० च्या सुमारात खारच्या १४ रोड भागात पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. या घटनेत पत्नी रक्तबंबाळ झाली तर आरोपी पती फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यानं जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित महिलेचा जबाब नोंदवून पोलीस आणखी माहिती गोळा करत आहेत. परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा ट्रेस करून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, आरोपी पतीने पूर्वनियोजित पत्नीवर चाकू हल्ला केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पत्नीवर हल्ला करण्यासाठी त्याने पेपर कटरसोबत आणले होते. सध्या जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. तिच्या संरक्षणासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर आरोपीच्या शोधासाठी पथके नेमली आहेत. लवकरच आरोपीला अटक करू असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Web Title: The husband attacked the wife who went for a walk in the Khar area of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.