पतीने पत्नीच्या गालाचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: October 21, 2023 04:23 PM2023-10-21T16:23:34+5:302023-10-21T16:23:38+5:30
भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( ६० फूट ) मार्गावर जैन अपार्टमेंट मध्ये हिना श्रीपाल शाह ह्या कुटुंबासह राहतात
मीरारोड - नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी पतीकडे पैसे मागितले म्हणून पत्नीचा गळा दाबत तिच्या गालाचा चावा घेतल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी पती वर गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( ६० फूट ) मार्गावर जैन अपार्टमेंट मध्ये हिना श्रीपाल शाह ह्या कुटुंबासह राहतात . पती श्रीपाल २०१५ साला पासून हिना यांच्या चारीत्यवर संशय घेऊन मारहाण करत असल्याने तसेच शारीरिक आणि मानसिक छळ प्रकरणी सप्टेंबर २०२३ मध्ये हिना यांच्या फिर्यादी वरून पती , सासू विमलाबेन व मावस सासू शारदाबेन संघवी यांच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे . त्यातच १० ऑक्टोबर रोजी देवीच्या पूजेसाठी पैसे मागितले म्हणून पती श्रीपाल याने वाद सुरु केला . त्याने पत्नीचा गळा दाबून तिला खाली पाडले आणि गालावर चावा घेऊन जखमी केले . सहायक पोलीस निरीक्षक शिपणे हे तपास करत आहेत .