बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 09:28 PM2022-06-03T21:28:49+5:302022-06-03T21:30:57+5:30

Crime News : पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे.

The husband embraced death as the wife fled; The love marriage took place 2 months ago | बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

googlenewsNext

जयपूर : सीतापुरा येथील एका कारखान्यातील पर्यवेक्षक दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून पुन्हा कामावर रुजू झाला होता. लग्नानंतर पती-पत्नीसोबत दोन महिने आनंदात घालवले. त्यानंतर अचानक एके दिवशी तो कामावर गेला असताना पत्नीने दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून पळ काढला. घरी आलेल्या पतीला पत्नी न दिसल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. ती बुंदी येथे आपल्या एक्स पतीकडे गेली असून परत येणार नसल्याचे कळते.

पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच सोनासोबत प्रेमविवाह झाला होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुंदी जिल्ह्यातील नैनवान येथील रहिवासी असलेले ३० वर्षीय सीताराम गुर्जर हे आपल्या पत्नीसोबत श्याम विहार प्रताप नगरमध्ये राहत होते. सीतापुरा येथील एका कारखान्यात तो सुपरवायझर होता. सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याने दियाली बुंदी येथील 28 वर्षीय सोना हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. २६ मे रोजी त्याची पत्नी घरातून निघून गेली. सीताराम यांनी पत्नीचा शोध घेतला, पण ती सापडली नाही, असे सांगितले जाते.


अगोदरच्या पतीकडे गेल्याने सीतारामला धक्काच बसला
यानंतर त्याला समजले ती तिच्या अगोदरच्या पतीसोबत बुंदीला गेली आहे आणि आता परत येणार नाही. याचा धक्का बसलेल्या सीताराम यांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास सांगानेर रेल्वे मार्गावर रेल्वेसमोर उडी मारून त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृताच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटवण्यात आली.

Web Title: The husband embraced death as the wife fled; The love marriage took place 2 months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.