मध्यरात्री पती टॉयलेट गेला होता, घरी येऊन पाहताे तर खाटेवर पत्नीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:36 PM2022-07-14T17:36:04+5:302022-07-14T17:47:25+5:30
DeadBody Found : पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चौरासी : डुंगरपूर जिल्ह्यातील कुआ पोलीस स्टेशन हद्दीतील बावडी गावात एका विवाहितेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणात माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा ठपका ठेवला आहे. पोलिसांनी वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचबरोबर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
डुंगरपूर जिल्ह्यातील कुआ पोलिस स्टेशनचे एसएचओ गोपालनाथ यांनी सांगितले की, गोपालचे वडील झोथरी येथील रहिवासी हिराजी परमार यांनी एक तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये गोपाल परमार यांनी सांगितले की, त्यांनी त्यांची मुलगी जया हिचे लग्न बावडी येथील शांतीलाल डामोर यांच्याशी केले होते. काल रात्री मला जयाच्या सासरचा फोन आला की, जयाला काहीतरी झालंय, तिला काही बोलता येत नाहीये. यानंतर पहाटे माहेरची लोकं जयाच्या सासरच्या घरी पोहोचले, तेथे त्यांना जया खाटेवर पडल्याचे दिसले. तिचा मृत्यू झाला होता.
नवरा लघुशंकेस गेला होता
तिच्या पतीला मृत्यूचे कारण विचारले असता, पतीने सांगितले की, मध्यरात्री लघुशंकेसाठी जाऊन आल्यानंतर जया बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या स्थितीत आढळली. त्यानंतर कुआ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात नेला. येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात माहेरच्या बाजूने मृताच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचे वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.