थोरल्या भावाचा आदर्श! आई भाजी विक्रेती, रोजंदारी कामगाराची मुलं बनली पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:55 PM2022-01-18T17:55:50+5:302022-01-18T18:33:23+5:30
Police News : उल्हासनगर कॅम्प नं-३ विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील गोपाळ समाजपाडा झोपडपट्टीत राहणारे अशोक हाटकर राशन दुकानात रोजंदारीचे काम करतात.
सदानंद नाईक
उल्हासनगर : विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळील गोपाळ समाजवाडीत राहणाऱ्या रोजंदारी कामगाराची दोन्हीं मुले ठाणे पोलीस सेवेत एकाच वेळी भरती झाले. दोन्ही मुलांनी आई वडिलांच्या कष्टाचे व मोठया भावाचा आदर्श ठेवून पोलीस भरती झाल्याची माहिती दिनेश हाटकर याने दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील गोपाळ समाजपाडा झोपडपट्टीत राहणारे अशोक हाटकर राशन दुकानात रोजंदारीचे काम करतात. तर पत्नी भाजी विकत होती. त्यांना रुपेश, दिनेश, विकास व मंगेश असे चार मुले असून अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी चारही मुलांना उच्च शिक्षण दिले. सर्वात मोठा मुलगा रुपेश ३ वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा पोलीस मध्ये भरती झाल्यानंतर, त्याच्या पेक्षा तिन्ही लहान भावानां पोलीस सरावासाठी अंबरनाथ येथील पोलीस अकॅमिक मध्ये ठाकले. चारही भावाचे प्राथमिक शिक्षण उल्हासनगर महापालिका शाळेत तर माध्यमिक शिक्षण शांतिग्राम शाळेत झाले. तसेच पदवीचे शिक्षण शहरातील आरकेटी महाविद्यालयात झाले.
मोठ्या भावाचे आदर्श समोर ठेवून ऑक्टोबर महिन्यात ठाणे पोलीस मध्ये लेखी व मैदानी परीक्षा तिन्ही हाटकर भावाने दिली. त्यापैकी दिनेश व विकास हे दोन्ही भाऊ ठाणे पोलीस दलात भरती झाल्याची नियुक्ती यादी १० जानेवारीला प्रसिद्ध झाली. अत्यंत हालाकीच्या परिस्थिती मध्ये सख्खे दोन्ही भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच सर्वात लहान भाऊ मंगेश यालाही पोलीस दलात जायचे असल्याची प्रतिक्रिया दिनेश व विकास हाटकर यांनी दिली. विठ्ठलवाडी गोपाळ समाजपाडा झोपडपट्टीतील घर अत्यंत लहान असल्याने, दोन वर्षांपूर्वी हाटकर कुटुंब खडगोलावली येथे भाड्याच्या खोलीत पोलीस असणाऱ्या मोठया भावाकडे राहण्यास गेले. समाजाने व नागरिकांनी हाटकर बंधुचा आदर्श पुढे ठेवावा. असे आवाहन स्थानिक नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केले.
अनिल देशमुखांना मोठा दणका, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
मुलांनी कष्टाचे पांग फेडले....वडील अशोक हाटकर
राशन दुकानात रोजंदारी काम करून मुलांना अत्यंत गरीब परिस्थिती शिक्षण दिले. तसेच पत्नीने भाजीपाला विकून संसाराला हातभार लावला. आमच्या कष्टाचे पांग मुलांनी फेडल्याची प्रतिक्रिया वडील अशोक हाटकर यांनी दिली.