तिघांनी वाट अडवली, तृतीयपंथीचे कपडे फाडले; अत्याचार केला अन्...; मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 04:38 PM2022-12-24T16:38:17+5:302022-12-24T16:38:23+5:30

मुंबईतील धक्कादायक घटना

The incident of three persons abusing a transgender has taken place in Govandi area of Mumbai. | तिघांनी वाट अडवली, तृतीयपंथीचे कपडे फाडले; अत्याचार केला अन्...; मुंबईतील धक्कादायक घटना

तिघांनी वाट अडवली, तृतीयपंथीचे कपडे फाडले; अत्याचार केला अन्...; मुंबईतील धक्कादायक घटना

googlenewsNext

मुंबई : मित्राला भेटायला गेलेल्या २६ वर्षीय तृतीयपंथीला तिघांनी मारहाण करत, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री शिवाजीनगर परिसरात घडली. मदतीला पुढे आलेल्या तृतीयपंथीवरही धारदार शस्त्राने हल्ला केला.

सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी फैजान सिद्धिकी (२७) याला अटक केली आहे. गोवंडी परिसरात तक्रारदार तृतीयपंथी बुधवारी रात्री एकच्या सुमारास त्याच्या रफिकनगरमध्ये राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी जात असताना, फैजानसह त्याच्या दोन साथीदारांनी त्यांची वाट अडविली, तसेच त्यांचे कपडे फाडून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. 

तृतीयपंथीने मदतीसाठी आरडाओरडा करताच, तेथील आणखी एक तृतीयपंथी पुढे आला. मात्र, आरोपींनी त्याच्याही डोक्यात हल्ला चढविला. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची वर्दी लागताच, शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तृतीयपंथींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर वरील घटनाक्रम समोर आला. या प्रकरणी पोलिसांकडून फैजानच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: The incident of three persons abusing a transgender has taken place in Govandi area of Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.