अटकेनंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक, पोलिसांना फिरवलं जंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:06 PM2022-12-05T12:06:31+5:302022-12-05T12:07:24+5:30

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीचा शोध घेवून सदर आरोपीला कोपर गावाच्या जंगलामधुन ताब्यात घेतलेले आहे. 

The inn criminal who escaped after the arrest was arrested, the police were turned to the forest in mandvi nalasopara | अटकेनंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक, पोलिसांना फिरवलं जंगल

अटकेनंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक, पोलिसांना फिरवलं जंगल

Next

नालासोपारा (मंगेश कराळे) - मांडवी पोलिसांनी अटक केलेला आरोपी अब्दुल रहमान ताहीर बडू (२८) हा शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस कस्टडी दरम्यान मांडवी पोलीस ठाण्याच्या पहिल्या माळ्यावरील खोलीच्या खिडकीच्या स्लायडींगमधुन खाली उडी मारुन अंधाराचा फायदा घेवुन मांडवी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील जंगलामध्ये पसार झालेला होता. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेवुन संपुर्ण जंगल परिसर तसेच भामटपाडा आणि कोपर गावातील जंगल शोध घेवुन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीचा शोध घेवून सदर आरोपीला कोपर गावाच्या जंगलामधुन ताब्यात घेतलेले आहे. 

१७ जुलैला मांडवी पोलीस ठाणे हददीमधील नालेश्वरनगर, खैरपाडा, या ठिकाणी घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रिल तोडून त्यावाटे आत प्रवेश करुन घरातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड असा एकूण १९ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार मांडवी पोलीस ठाण्यामध्ये घरफोडी, मोबाईल चोरीचे दाखल असलेले अन्य गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटिकरण अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडुन सुरू होता. त्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध सुरु होता. गुन्हयातील पाहीजे आरोपी अब्दुल बडु याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे प्रकटिकरण अधिकारी व पथक यांनी या आरोपीला सापळा कारवाई करुन ताब्यात घेतले. गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल व इतर गुन्हयातील एकुण ८१ हजार ८१७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक आरोपीत याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच आरोपीने इतर पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी, मोबाईल चोरी, मंदीरात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यादृष्टीने तपास सुरु आहे. या आरोपीवर सन २०१४ मध्ये लुक आउट सर्क्युलर नोटीस ही जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 

Web Title: The inn criminal who escaped after the arrest was arrested, the police were turned to the forest in mandvi nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.