जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:29 AM2024-12-12T06:29:00+5:302024-12-12T06:29:12+5:30

साताऱ्यातील घटना; वडिलांना सोडण्यासाठी तरुणीचा होता अर्ज

The judge asked for five lakhs for bail; A case has been registered against four | जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल

जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत व जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमांन्वये चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुण्यातील तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ तसेच १० डिसेंबरला घडला आहे.

प्रकरण काय? 
nतक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले तसेच जामीन करून देतो म्हणून न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. 
n१० डिसेंबरला संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी व्यक्तीने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला.  

Web Title: The judge asked for five lakhs for bail; A case has been registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.