चिमुकली रडत म्हणाली... मला पप्पाकडे जायचे नाही, कारण ऐकून आत्याने काळजाला कवटाळले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 08:22 AM2022-12-18T08:22:50+5:302022-12-18T08:23:43+5:30

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शिरूर कासार तालुक्यातील एका गावातील आहे. सात वर्षांच्या चिमुकलीवर जन्मदात्यानेच कुकर्म केले.

The little girl cried and said... I don't want to go to papa, reason hearing for this, aunt came to police station in beed | चिमुकली रडत म्हणाली... मला पप्पाकडे जायचे नाही, कारण ऐकून आत्याने काळजाला कवटाळले... 

चिमुकली रडत म्हणाली... मला पप्पाकडे जायचे नाही, कारण ऐकून आत्याने काळजाला कवटाळले... 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार (जि. बीड) : आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त आलेली सात वर्षांची मुलगी परत घरी जायला धजावत नव्हती. मला पप्पाकडे जायचे नाही... असे म्हणून तिने रडवेला चेहरा केला. आत्याने मायेने जवळ घेऊन विचारपूस केली तेव्हा जन्मदाताच तिचे लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. शिरूर ठाण्यात १६ डिसेंबरला नराधम पित्यावर गुन्हा नोंद झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शिरूर कासार तालुक्यातील एका गावातील आहे. सात वर्षांच्या चिमुकलीवर जन्मदात्यानेच कुकर्म केले. ऑक्टोबर २०२२ मध्ये ही घटना घडली. चिमुकलीने भीतीपोटी ही बाब आईला सांगितली नाही. दरम्यान, पीडित चिमुकली नेकनूर ठाणे हद्दीतील आत्याकडे एका कार्यक्रमासाठी आली होती. कार्यक्रमानिमित्त तीन दिवस राहिल्यावर तिला तिच्या गावी सोडण्याची तयारी आत्याने केली. मात्र, तिने गावी पप्पाकडे जाण्यास नकार देत इथेच राहायचे आहे, असे सांगितले. आत्याने जवळ घेऊन बोलते केल्यावर तिने रडवेल्या चेहऱ्याने आपबिती सांगितली. 

आत्याने दिली पोलिसांत तक्रार
आत्याने धीटपणे शुक्रवारी शिरूर पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून नराधम पित्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले.

Web Title: The little girl cried and said... I don't want to go to papa, reason hearing for this, aunt came to police station in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.