30 वर्षांपूर्वीच्या हत्येतील प्रमुख आरोपीला अटक, विक्रोळीत केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:56 PM2023-06-17T12:56:44+5:302023-06-17T12:57:05+5:30

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने विक्रोळीमध्ये केलं आरोपीला जेरबंद

The main accused in the murder of 30 years ago was arrested, and the action was taken | 30 वर्षांपूर्वीच्या हत्येतील प्रमुख आरोपीला अटक, विक्रोळीत केली कारवाई

30 वर्षांपूर्वीच्या हत्येतील प्रमुख आरोपीला अटक, विक्रोळीत केली कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तीस वर्षांपूर्वी बंगल्यात चोरी करण्यासाठी गेलेल्या आणि बंगल्यातील दाम्पत्याची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या अविनाश पवार (४९) या प्रमुख आरोपीला शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे पकडले आहे. लोणावळ्याच्या सत्यम सोसायटीतील यशोदा बंगल्यात पवार आणि त्याचे दोन साथीदार अमोल काळे व विजय देसाई यांनी ४ ऑक्टोबर १९९३ रोजी  धनराज ठाकरसी कुरवा (५५) व त्यांच्या पत्नी धनलक्ष्मी (५०) यांची दोरीने गळा आवळून नंतर धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. यातील काळे व देसाई या दोघांना त्यावेळी लोणावळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र पवार फरार होता.

गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक दयानंद नायक यांना खबऱ्यांमार्फत पवारबाबत टीप मिळाली होती की अविनाश पवार  जो स्वतःचे नाव, ओळख लपवून समाजात वावरत होता. नायक यांच्या पथकाने विक्रोळी पूर्वच्या टागोर नगरमधून त्याला पकडले.

इतके वर्षे कुठे होता आरोपी?

अविनाश पवारने हत्या केल्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांसह तो दोन दिवस शिर्डीला व त्यानंतर पुन्हा दोन दिवसांसाठी तो लोणावळ्याला आला. तेथून तो दिल्लीला जाऊन वर्षभर हॉटेलमध्ये काम करत होता. त्यानंतर १९९५ मध्ये तो कसारा परिसरात येऊन १९९६ पर्यंत त्याने गॅरेजमध्ये काम केले. पुढे १९९७ ते १९९८ मध्ये अहमदनगर येथे ड्रायव्हिंग व हॉटेलमध्ये काम केले. १९९९ मध्ये त्याने विक्रोळीतील प्रमिला हिच्याशी प्रेमविवाह केला.

Web Title: The main accused in the murder of 30 years ago was arrested, and the action was taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.