धक्कादायक! जेवणात केस निघाल्यानं पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला अन् सगळ्यांसमोरच...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 09:28 AM2022-12-11T09:28:53+5:302022-12-11T09:29:31+5:30
यासंदर्भात पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती जेवण करत असताना जेवणात केस निघाला. या मुळे तो प्रचंड भडकला. त्याने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्याने तिचे हात-पाय बांधून...
जेवणात केस निघाला म्हणून पती रागाच्या भरात अक्षरशः राक्षस बनला आणि त्याने त्याच्या पत्नीसोबत एवढे घाणेरडे कृत्य केले, की जे वाचून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील. याहूनही राक्षसीपणाचा कळस म्हणजे, या घाणेरड्या कृत्यात त्याच्या कुटुंबातील लोकही त्याला मदत करत होते. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील आहे. याप्रकरणी संबंधित 30 वर्षीय महिलेने आपल्या पतीसह तीन लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती जेवण करत असताना जेवणात केस निघाला. या मुळे तो प्रचंड भडकला. त्याने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्याने तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न केला. पण तिने त्याला विरोध केला. यामुळे त्याने तिच्या डोक्याचे केस कापत तिचे टक्कल केले.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा संपूर्ण प्रकरा सुरू असताना, पीडित महिलेची सासू आणि दीर तेथेच उभे राहून हा संपूर्ण प्रकार बघत होते आणि तिच्या पतीला प्रोत्साहन देत होते, असा आरोपही पीडितेने केला आहे. एवढेच नाही, तर हा संपूर्ण प्रकार पीडितेने तिच्या माहेरच्यांना फोन करून सांगितला. ते तिच्या घरी पोहोचले. मात्र, ते घरी पोहोचताच तिच्या पतीने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असेही संबंधित पीडित महिलेने म्हटले आहे.
याशिवाय, पीडितेचा पती हुंड्याची मागणी करत तिला मारहाणही करतो आणि मुलाला सोडून घरातून निघून जा असेही म्हणतो, असा आरोपही संबंधित महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटकही करण्यात आली आहे. तसेच संबंधित पीडिता आपल्या माहेरी गेली आहे.