अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाचा खून, 12 तासांत लागला छडा
By दत्ता यादव | Published: December 11, 2022 02:56 PM2022-12-11T14:56:35+5:302022-12-11T14:57:56+5:30
एकाला अटक; एलसीबीकडून १२ तासांच्या आत गुन्हा उघड
सातारा : पाटण तालुक्यातील भैरेवाडी येथील वडाप व्यावसायिकाच्या खुनाचा छडा लावण्यात स`थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हाखून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नारायण तुकाराम मोंडे (वय ४८, रा. भैरेवाडी, ता. पाटण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडाप व्यावसायिक सीताराम बबन देसाई (वय ४९, रा. भैरेवाडी, ता. पाटण) हे शुक्रवार, दि. ९ रोजी रात्री जनावरांच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेले होते. रात्री गाढ झोपेत असताना डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मल्हार पेठ पोलिस आणि स`थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटनास`थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना या खुनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समजले. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच सीताराम देसार्इयांच्या घरातल्या लोकांनीही संशय व्यक्त केला होता. संशयित नारायण मोंडे याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्याच्या घरी गेले. मात्र, तोऊरूल गावच्या हद्दीतील जंगलात लपून बसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर एलसीबी टीम आणि मल्हार पेठे पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून जंगलात सात किलोमीटर पायपीट केली. त्यावेळी झाडात लपून बसलेल्या नारायण मोंडे याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने सीताराम देसार्इ यांचा खून केल्याची कबुली दिली. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केला असल्याचे नारायण मोंडे याने पोलिसांना सांगितले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, राजकुमार ननावरे, मोहन नाचण, स्वप्निल माने, शिवाजी गुरव, मयूर देशमुख आदींनी ही कारवार्इ केली.