सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत!

By अझहर शेख | Published: March 4, 2023 05:50 PM2023-03-04T17:50:57+5:302023-03-04T17:51:06+5:30

याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

The negligence of officials and contractors caused the death of bakery worker six months ago | सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत!

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत!

googlenewsNext

नाशिक : मागील वर्षी ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेपासून रात्री उशीरापर्यंत मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी द्वारकेकडून काजी कब्रस्तानसमोरील पखालरोवरील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढताना सायकलस्वार बेकरी कामगार असलेला बबलू वकील खान (२३) या सायकलस्वार तरुणाचा वीजप्रवाहचा धक्का बसल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. द्वारकाजवळील पखालरोड येथे सखल भाग असल्याने दुभाजकापर्यंत पाण्याचा तलाव तयार झाला होता. जुने नाशिकमधील नानावली भागातील बेकरीत काम करणारा बबलू खान हा तरुण हा रस्ता शॉर्टकट असल्याने सायकलवरुन घराकडे द्वारकामार्गे लवकर पाेहचण्याचा प्रयत्ना होता. त्यामुळे त्याने पाण्यातून वाट काढण्यासाठी सायकल साचलेल्या पाण्यात टाकली असता त्यास वीज प्रवाहचा जोरदार धक्का लागला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मुंबईनाका पोलिसांनी अकस्मात नोंद करुन घटनेचा तपास सुरू केला.

सहा महिन्यानंतर बबलू खान याच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत ठरलेल्या संशयितांची नावे समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार भगवान हरी भोये (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासगी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक संशयित रत्नाकर कृष्णदेव मिश्रा (रा. पाथर्डी फाटा), अभियंता विशाल देविदास गायखी, (रा. उत्तरानगर) आणि ठेकेदार निलेश गिरीधर कुवर( रा. सिडको) यांच्यावर बबलु खान याच्या मृत्यसू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.

...म्हणून झाला शॉर्टसर्किट! -
पखालरोडवर असलेल्या मनपाचा पथदीपाची (क्रमांक एनई१५ जीएससी २-४५) दुरूस्ती करणारे खासगी कंपनीचे मिश्रा, गायखी व कुवर यांनी निष्काळीजपणा केला. यामुळे पथदीपामधील विद्युत प्रवाह साचलेल्या पाण्यात उतरला. संबंधितांनी विद्युत खांबाला वीजप्रवाह नियंत्रित करण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने लागणारे ‘ईएलसीबी’ व ‘एमसीबी’ बसवलेले नव्हते. त्यामुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
 

Web Title: The negligence of officials and contractors caused the death of bakery worker six months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक