धक्कादायक! वृध्दाने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने घाव घातले; नंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपविले!

By अनिल गवई | Published: December 29, 2022 05:45 PM2022-12-29T17:45:30+5:302022-12-29T17:48:02+5:30

पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद  तालुक्यातील माउली येथील बुधाजी भिकाजी वानखडे (६० ) या वृध्द इसमाने त्याच्या शोभाताई भिकाजी वानखडे (५५) पत्नीवर बुधवारी रात्री कुऱ्हाडीने सपासप वार केले. वृध्द महिला मृत्यू पावल्याची खात्री पटल्यानंतर स्वत:ही गळफास घेत, जीवनयात्रा संपविली.

The old man first wounded his wife with an axe; Then he ended himself by hanging | धक्कादायक! वृध्दाने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने घाव घातले; नंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपविले!

धक्कादायक! वृध्दाने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने घाव घातले; नंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपविले!

Next

जळगाव जामोद : खामगाव तालुक्यातील शिराळा येथील वृध्दाने पत्नीचा खून केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, जळगाव जामोद तालुक्यातील एका वृध्दाने पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यानंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपविल्याची खळबळजनक घटना माउली येथे गुरूवारी उघडकीस आली. बुधवारी उशीरा रात्री घडलेल्या या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलाने सकाळी दरवाजा उघडल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद  तालुक्यातील माउली येथील बुधाजी भिकाजी वानखडे (६० ) या वृध्द इसमाने त्याच्या शोभाताई भिकाजी वानखडे (५५) पत्नीवर बुधवारी रात्री कुऱ्हाडीने सपासप वार केले. वृध्द महिला मृत्यू पावल्याची खात्री पटल्यानंतर स्वत:ही गळफास घेत, जीवनयात्रा संपविली. ही दुर्देवी घटना मुलाने दरवाजा उघडल्यानंतर गुरूवारी उघडकीस आली. मृतक वानखडे दाम्पत्याचा मुलगा सदानंद वानखडे याच्या तक्रारीवरून शोभाबाई वानखडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी  बुधाजी भिकाजी वानखडे या वृध्दाविरोधात मृत्यूपश्चात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तर बुधाजी वानखडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर  करीत आहेत.

पत्नीची हत्याकरणारा वृध्द मनोरूग्ण
- वृध्देने काठी फेकून मारल्याच्या संतापातून एका ७५ वर्षीय वृध्दाने काठीने ठेचून त्याच्या ७० वर्षीय पत्नीचा १६ डिसेंबर रोजी खून केला. त्यानंतर आता जळगाव जामोद तालुक्यातील एका मनोरूग्णाने चक्क कुऱ्हाडीने घाव घालून वृध्देचा खात्मा केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेतला. वृध्देची हत्या करणारा इसम हा मनोरूग्ण असल्याचे समोर येत आहे. वेडसरपणाच्या झटक्यातून वृध्दाने हा प्रकार केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.
 

Web Title: The old man first wounded his wife with an axe; Then he ended himself by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.