जिच्यावर प्रेम केलं, तिच्यावर हल्ला करून भावाला घातल्या गोळ्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 08:12 PM2022-05-01T20:12:47+5:302022-05-01T20:13:36+5:30

One Sided Love And murder : माहिती मिळताच पीलीभीत एसपी दिनेश कुमार पी यांच्यासह सर्व बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला.

The one who fell in love, attacked on girl and shot her brother ... | जिच्यावर प्रेम केलं, तिच्यावर हल्ला करून भावाला घातल्या गोळ्या अन्...

जिच्यावर प्रेम केलं, तिच्यावर हल्ला करून भावाला घातल्या गोळ्या अन्...

Next

पीलीभीत - उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये शनिवारी एका सनकी प्रियकराने खळबळ उडवून दिली. प्रेमाच्या नावाखाली त्याने आधी मुलीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या केली. बाकीच्यांसह मुलगी आणि तिच्या आईला हल्ला करून जखमी केले आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच पीलीभीत एसपी दिनेश कुमार पी यांच्यासह सर्व बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.

हे प्रकरण पीलीभीतच्या अमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिरसा गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जो विक्षिप्त प्रियकर, ज्या मुलीला पसंत करत होता आणि तिच्यावर प्रेम असल्याचा ग्वाही करत होता, तिचे लग्न दुसरीकडे ठरले होते. या रागातून त्याने ही गुन्हेगारी घटना घडवली. अवघ्या 19 वर्षांचा हा प्रियकर रिंकू गंगवार बरेलीच्या बहेडी कोतवाली भागातील हरिहरपूर गावचा होता. सिरसा येथील एका 22 वर्षीय तरुणीवर प्रेम असल्याचा दावा त्याने केला होता. आज सकाळी तो थेट मुलीच्या घरी गेला.

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...


तेथे पोहोचताच त्याने बाकीच्यांसह समोर असलेल्या मुलीच्या आईवर हल्ला केला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या मुलीलाही सोडले नाही, जिच्यावर त्याने प्रेम केल्याचा दावा केला तिच्यावरही हल्ला केला.  रवींद्र पाल (वय-28 वर्षे) याने रिंकूला आई-बहिणीवर अशा प्रकारे मारहाण करताना पाहिल्यानंतर तो पळत पळत तेथे पोहोचला. त्यावेळी रवींद्रला पाहताच त्याच्या छातीत रिंकूने गोळी झाडली. रवींद्र पाल याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रिंकूने तेथून पळायला सुरुवात केली. मात्र, 20 मीटर अंतरावर जाऊन थांबून स्वत:वर त्याने गोळी झाडली. त्याचाही तेथे मृत्यू झाला. एसपी दिनेश कुमार पी यांनी सांगितले की, घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी केली जात आहे. जखमी मुलगी आणि तिच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावाचे पोलीस छावणीत रुपांतर झाले आहे.

Web Title: The one who fell in love, attacked on girl and shot her brother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.