नऊ महिने ज्याला गर्भात सांभाळले त्याचाच घेतला जीव, प्रसुतीनंतर आईनेच केली नवजात बाळाची हत्या, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:33 IST2025-03-13T18:25:06+5:302025-03-13T18:33:18+5:30

US Crime News: एका महिलेने तिच्या नवजात अर्भकाचा जन्मताच जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The one who was nurtured in the womb for nine months took his own life, the mother killed the newborn baby after giving birth, then... | नऊ महिने ज्याला गर्भात सांभाळले त्याचाच घेतला जीव, प्रसुतीनंतर आईनेच केली नवजात बाळाची हत्या, त्यानंतर...  

नऊ महिने ज्याला गर्भात सांभाळले त्याचाच घेतला जीव, प्रसुतीनंतर आईनेच केली नवजात बाळाची हत्या, त्यानंतर...  

एका महिलेने तिच्या नवजात अर्भकाचा जन्मताच जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना येथे एका महिलेने तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच ठार मारल्याचं उघड झालं आहे. एवढंच नाही तर या महिलेने बाळाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये पॅक करून दुसऱ्या खोलीत फेकून दिला.  

दरम्यान, आरोपी महिलेविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलं आहे. या महिलेवर प्रसुतीवेळी तिने तिच्या बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांनी काढलेल्या वॉरंटमधील उल्लेखानुसार या महिलेने प्रसुतीवेळी गर्भनाळ कापल्यानंतर नवजात बाळावर ओपनरने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर या बाळाचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये बंद करून दुसऱ्या खोलीत फेकून दिला.  

या घटनेबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, मी माझ्या २५ वर्षांच्या सेवेत एवढा भयानक प्रकार पाहिला नाही. जेव्हा रुग्णालयातील प्रशासनाने  बोलावल्यानंतर आम्ही इथे पोहोचलो, तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या महिलेवर बाल शोषण आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.  

Web Title: The one who was nurtured in the womb for nine months took his own life, the mother killed the newborn baby after giving birth, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.