दान पेटी फोडण्याचा डाव फसला, चोरट्याला आधीच पकडला
By सागर दुबे | Published: August 26, 2022 09:39 PM2022-08-26T21:39:30+5:302022-08-26T21:41:05+5:30
शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास टोलपा बारेला याने दाणा बाजार येथील एका मंदिरातील रक्कम चोरी केली. दानपेटी उघडण्याचा प्रयत्न केला.
जळगाव : दाणाबाजार येथील एका मंदिराची दानपेटी फोडण्यापूर्वी चोरट्याला शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी पहाटे ४ वाजता पोलिसांनी केली असून चोरट्याला ताब्यात घेतले आहे. टोलपा दयाराम बारेला (रा. खरगोन, मध्यप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.
शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास टोलपा बारेला याने दाणा बाजार येथील एका मंदिरातील रक्कम चोरी केली. दानपेटी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उघडता आली नाही म्हणून तो मोठा दगड शोधू लागला. त्याचवेळी सुभाष चौकात ड्यूटीला असलेले शहर पोलीस ठाण्यातील विजय निकुंभ, दीपक पाटील, ओमप्रकाश सोनी या पोलीस कर्मचाऱ्यांना बारेला अंधारात फिरताना दिसून आला.
पोलिसांनी घेतले ताब्यात -
दरम्यान, टोलपा बारेला हा दगडाने मंदिरातील दानपेटी फोडणार तोच पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी केल्यावर त्याने नाव सांगितले व मंदिरात पडलेली रक्कम चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी बारेला याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.