प्रेयसीचा खून करून पसार झालेल्या प्रियकराला पोलिसांनी केली अटक!
By नितीन पंडित | Published: September 21, 2023 03:38 PM2023-09-21T15:38:05+5:302023-09-21T15:38:20+5:30
शब्बीर दिलावर शेख असे अटक केलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे.
भिवंडी : लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियसीची हत्या करून परराज्यात पळून गेलेल्या प्रियकरास कोनगाव पोलिसांनी अवघ्या तीस तासात अटक केली आहे. प्रियसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी घेयलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शब्बीर दिलावर शेख असे अटक केलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे.
१८ सप्टेंबर रोजी कोनगाव याठिकाणी गणेशनगर येथील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी एका महिलेची धारदार हत्याराने हत्या झाल्याचे उघड झाले होते.महिलेच्या मैत्रिणीने दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मयत मधू प्रजापती हिच्या मैत्रिणीकडे केलेल्या चौकशीत मधू हीचा मित्र शब्बीर दिलावर शेख यांचे नाव समोर आले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून तो काम करत असलेल्या अंबरनाथ येथील कंपनीमधील त्याच्या सहकाऱ्यांकडे माहिती घेतली असता तो पश्चिम बंगाल राज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, विनोद कडलग,पोलिस उपनिरीक्षक उबाळे,अस्लेशा घाटगे,निलेश वाडकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निता पाटील,पोलिस हवालदार उदमले,अरविंद गोरले,जगदिश पाटील,सुनिल पाटील,घोडसरे, पोलीस नाईक नरेंद्र पाटिल,पोलीस शिपाई दिगांबर तुपकर, राहुल वाकसे, हेमराज पाटिल, कुशल जाधव, खडसरे,गायकवाड,साळुंखे हे पोलिस पथक आरोपी शब्बीरच्या शोधासाठी पश्चिम बंगाल राज्यातील त्याच्या मूळगावी गेले.स्थानिक पश्चिम बंगाल येथील पोलिसांच्या मदतीने तपास केला असता तो सासुरवाडी येथे निघून गेल्याचे समजताच पश्चिम बंगाल येथील सारापुला जिल्हा २४ परगणा येथे लपून बसलेल्या शब्बीर यास ताब्यात घेतले.पुढील तपास पोलीस निरीक्षक दीप बने हे करीत आहेत.