पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:57 PM2022-12-01T12:57:58+5:302022-12-01T12:59:29+5:30

माणिकपूर पोलिस संशयाच्या भोवऱ्यात; तीन महिन्यांपूर्वीची घटना

The police had not registered Shraddha's missing complaint | पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना

पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : तीन महिन्यांपूर्वीच श्रद्धा वालकर ही बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या चुलत भावाने माणिकपूर पोलिस ठाण्यात नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र माणिकपूर पोलिसांनी तक्रार न नोंदवता श्रद्धा परत येईल, असा अजब तर्क लावला होता. यामुळे माणिकपूर पोलिसच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

वसईतील श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत तिच्या प्रियकराकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर अवघा देश हादरला. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रियकर आफताब पूनावालाविरोधात देशभर संतापाची लाट उसळलेली असताना या संपूर्ण प्रकरणात आता वसईतील माणिकपूर पोलिस ठाणे वादात सापडले आहे.

n दरम्यान, आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. त्याने अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिल्याचे सूत्रांकडून कळते.
n तीन महिन्यांपूर्वी श्रद्धाचा कोठेच थांगपत्ता न लागल्याने तिच्या चुलत भावाने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती या चुलत भावाने पोलिसांना दिली आहे. मात्र त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. 

९० दिवस आरोपी फिरला उजळमाथ्याने
१ श्रद्धाबाबतचे प्रकरण अधिक गंभीर होत गेल्याने माणिकपूर पोलिसांनी श्रद्धासंदर्भातली तक्रार नोंदवून तपास केला असता तर श्रद्धाच्या निर्घृण खुनाचा उलगडा लवकर झाला असता. 
२ या तब्बल ९० दिवसांत माणिकपूर पोलिसांनी दाखवलेल्या बेपर्वाईमुळेच श्रद्धाचा मारेकरी ९० दिवस उजळ माथ्याने वावरत राहिला. माणिकपूर पोलिसांनी वेळीच तक्रार नोंदवून घेतली असती तर श्रद्धाच्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागलाच नसता. 
३ दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या एका जबानीत श्रद्धाच्या चुलत भावाने हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे, मात्र आता श्रद्धाच्या चुलत भावाच्या जबानीनंतर माणिकपूर पोलिसांचा हलगर्जीपणा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

श्रद्धाच्या वडिलांचे आफताबशी खटके
श्रद्धा वालकर हिचे वसईत राहत असताना अनेकदा आफताबबरोबर खटके उडाले. त्यासंदर्भात तिने तुळिंज पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती, मात्र शेवटी आफताबने तिचा जीव घेतलाच. श्रद्धाची हत्या करून वसईत उजळ माथ्याने वावरणारा आरोपी आफताब पूनावाला हा माणिकपूर पोलिसांनी उशिरा दाखल केलेल्या तक्रारीमुळेच इतके दिवस गुन्हा करून उजळ माथ्याने वावरत राहिला, असे श्रद्धाच्या चुलत भावाचे म्हणणे आहे. 

Web Title: The police had not registered Shraddha's missing complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.