पोलीस जेवायला हॉटेलात गेले; रस्सा चांगला नसल्याचे सांगताच मालकाने कोंडून बदडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 07:38 AM2022-12-18T07:38:31+5:302022-12-18T07:38:46+5:30

कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांना वाढलेल्या रश्याला चव नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावरून वाद सुरु झाला.

The police went to the Jagdamb hotel of Koparkhairane for dinner; broth was not good, owner closed doore and beat them | पोलीस जेवायला हॉटेलात गेले; रस्सा चांगला नसल्याचे सांगताच मालकाने कोंडून बदडले

पोलीस जेवायला हॉटेलात गेले; रस्सा चांगला नसल्याचे सांगताच मालकाने कोंडून बदडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रस्सा चांगला नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेलचालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली.

कोपरखैरणे पोलिस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी यांच्यासोबत ही घटना घडली आहे. गुरुवारी ते कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांना वाढलेल्या रश्याला चव नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना खायचे असेल तर खा नाही तर नका खाऊ नका, असे उलट उत्तर दिले. 

दरम्यान, कायद्याच्या रक्षकांबरोबरच अशी घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ले होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असे सामान्यांचे मत आहे.

हॉटेलचालक, कर्मचारी फरार
तिघा पोलिसांनी त्यांना ग्राहकांसोबत अशा प्रकारे उद्धट बोलण्याचा जाब विचारला. यावरून हॉटेल कर्मचारी व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून तिघा पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात हॉटेलमालक अक्षय जाधव व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: The police went to the Jagdamb hotel of Koparkhairane for dinner; broth was not good, owner closed doore and beat them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस