रक्षकच भक्षक; महिला व बालकल्याण अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:19 PM2023-08-21T12:19:02+5:302023-08-21T12:19:40+5:30

दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे

The protector is the predator; A minor girl was raped by a women and child welfare officer in delhi, arrest by police | रक्षकच भक्षक; महिला व बालकल्याण अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रक्षकच भक्षक; महिला व बालकल्याण अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली सरकारमधील महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक न केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही पोलिसांना नोटीस जारी करत याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्यास अटक केली आहे.  

दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २० जुलै रोजी गुन्हा दाखल केला, मात्र अद्यापही आरोपी मोकाटच होता. दरम्यान, १ ऑक्टोबर २०२० रोजी पीडित मुलगी वडिलांच्या निधनानंतर आरोपी व्यक्तीच्याच घरी राहात होती. आरोपीने नोव्हेबर २०२० ते जानेवारी २०२१ अल्पवयीन पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. त्यातून, ती युवती गर्भवती राहिली होती. त्यानंतर, आरोपी अधिकाऱ्याच्या पत्नीने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी दिल्ली सरकारने दखल घेत चौकशी करुन आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली होती. तसेच, संबंधितावर कारवाई करण्याचेही बजावले होते. ''महिला आणि बालविकास विभागातील उपसंचालक पदावर बसलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यावर मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. आपण, दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. ज्याचे काम मुलींचे रक्षण करणे हे होते ते जर शिकारी बनले तर मुली कुठे जातील. त्याला लवकरच अटक झाली पाहिजे, असे ट्विट स्वाती मालीवाल यांनी केले होते. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यास अटक केली. 

Web Title: The protector is the predator; A minor girl was raped by a women and child welfare officer in delhi, arrest by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.