देहविक्रीसाठी थायलंडमधून आणलेल्या १५ मुलींची सुटका, पाच हजारांमध्ये झाला एकीचा सौदा
By जितेंद्र कालेकर | Published: October 2, 2024 07:24 PM2024-10-02T19:24:07+5:302024-10-02T19:24:18+5:30
ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिला तसेच काही तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणी विरोधी प्काला मिळाली होती.
ठाणे : मसाज पार्लरच्या नावाखाली थायलंड देशातील महिलांना देहविक्रीसाठी तयार करुन त्यांच्याकडून एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या उल्हासनगरच्या हॉटेलचा मॅनेजर कुलदिप उर्फ पंकज सिंग (३७, रा. उल्हासनगर) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पकाने अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांनी बुधवारी दिली. त्यांच्या ताब्यातून १५ मुलींची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिला तसेच काही तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणी विरोधी प्काला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेश पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे आणि हवालदार संजय राठोड आदींच्या पकाने २ ऑक्टोबर राजी पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर तीन, सेक्शन १७ मधील सितारा लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये एका बनावट ग्राहकाच्या मदतीने धाड टाकली.
या ग्राहकाने इशारा केल्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. त्यावेळी एका महिलेसाठी पाच हजारांचा सौदा झाला होता. यातील काही रक्कम हॉटेलच्या मॅनेजरकडे तर काही रक्कम या महिलांना दिली जात होती. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार याठिकाणी सुरु होता. त्यांच्याकडील पासपोर्ट आणि व्हिजाची तपासणी केली जात असून त्यांनी या कागदपत्रांसाठी कोणाची मदत ष्घेतली, याचीही चौकशी केली जात आहे.
मॅनेजर कुलदीप याने तब्बल १५ थायी मुली तसेच महिलांना या बनावट गिऱ्हाईकांकडे आणल्या. पोलिसांच्या पथकाने लॉजच्या मॅनेजरसह चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर १५ पिडित महिलांची सुटका केली. या लॉजमधून पाच लाख २७ हजारांची रोकड आणि सामुग्री जप्त केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.