स्वदिच्छाचा मृतदेह फायबर रिंगमध्ये घालून समुद्रात टाकला, मृतदेहाच्या अवशेषाचा नौदलाकडूनही शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 06:28 AM2023-01-22T06:28:16+5:302023-01-22T06:28:22+5:30

वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेचा मृतदेह फायबर ट्यूबमध्ये टाकून त्याची समुद्रात विल्हेवाट

The remains of the dead body were also searched by the Mumbai Police and the Navy | स्वदिच्छाचा मृतदेह फायबर रिंगमध्ये घालून समुद्रात टाकला, मृतदेहाच्या अवशेषाचा नौदलाकडूनही शोध

स्वदिच्छाचा मृतदेह फायबर रिंगमध्ये घालून समुद्रात टाकला, मृतदेहाच्या अवशेषाचा नौदलाकडूनही शोध

googlenewsNext

मुंबई :

वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेचा मृतदेह फायबर ट्यूबमध्ये टाकून त्याची समुद्रात विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाला दिली. न्यायालयाने या हत्या प्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंह व अब्दुल अन्सारी यांच्या पोलिस आरोपींनी कबुलीजबाबात मान्य केले आहे. तसेच या कबुलीजबाबाद्वारे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, खुल्या न्यायालयात सांगू शकत नाही, असे पोलिसांनी  शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले आहे.

स्वदिच्छाच्या मृतदेहाच्या अवशेषाचा शोध मुंबई पोलिसांसह नौदलही घेत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना फायबर रिंग ट्यूब मिळाली. या ट्यूबद्वारे मिथ्थू सिंह याने स्वदिच्छाच्या मृतदेहाची समुद्रात विल्हेवाट लावली. मात्र, त्यासाठी त्याने वापरलेले लाइफ जॅकेट आणि स्वदिच्छाचा फोन, पर्स अद्याप हाती लागली नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुढील तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली.
कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत स्वदिच्छाची हत्या केल्याचे  २५ जानेवारीपर्यंत आरोपींना कोठडी सुनावली.

 राज्य मानवी आयोगात तक्रार दाखल
■ पोलिसांच्या विनंतीला आरोपींचे वकील हर्षमान चौहान यांनी आक्षेप घेतला. २०२१ मध्येही वांद्रे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांची छळवणूक केली होती.
■ यासंदर्भात राज्य मानवी आयोगात तक्रार करण्यात आली आहे. आता हत्येप्रकरणातही पोलिस या दोघांनाच गुन्हेगार मानत आहे.
१४ महिने पोलिस या दोघांना त्रास देत आहे. पोलिस त्यांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा युक्तिवाद चौहान यांनी केला.

Web Title: The remains of the dead body were also searched by the Mumbai Police and the Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.