दरोडेखोरांनी दागिन्यांसह महिलेच्या भाचीलाही पळवले; शनिवारी रात्रीचा थरार

By देवेंद्र पाठक | Published: November 26, 2023 04:08 PM2023-11-26T16:08:24+5:302023-11-26T16:08:33+5:30

धुळे  येथील घटना, पहाटे गुन्हा दाखल

The robbers also made away with the jewels of the woman's niece; Saturday night thrills | दरोडेखोरांनी दागिन्यांसह महिलेच्या भाचीलाही पळवले; शनिवारी रात्रीचा थरार

दरोडेखोरांनी दागिन्यांसह महिलेच्या भाचीलाही पळवले; शनिवारी रात्रीचा थरार

साक्री : चाकू आणि बंदुकीचा महिलेला धाक दाखवून दागिन्यांसह महिलेच्या २३ वर्षीय भाचीला दरोडेखोरांनी पळवून नेल्याची खळबळजनक घटना साक्री शहरातील सरस्वती नगरात शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी सकाळी ६ वाजता दरोडेखोरांविधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान दरोडेखोरांनी ऐवजासह तरूणीलाही पळवून नेल्याची घटना जिल्ह्यात पहिल्यांदाच घडल्याने, खळबळ उडालेली आहे.

साक्री शहरातील सरस्वती नगरात राहणारे नीलेश पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची पत्नी ज्योत्सना पाटील व भाची एकटीच होती. ही संधी साधत काळे कपडे परिधान केलेल्या एका दरोडेखोराने दार ठोठावत, घरात प्रवेश केला. त्या पाठोपाठ चार दरोडेखोर घरात आले. ते हिंदी भाषा बोलत होते. घरात येताच चाकूचा धाक दाखवित त्यांनी ज्योत्सना पाटील यांना दागिने कुठे आहे असे विचारले. त्यांनी तिजोरीतून ८८ हजार ५०० रूपयांचे दागिने काढून घेतले. सोबत घरात असलेल्या महिलेच्या २३ वर्षीय भाचीलाही घेऊन गेले. थोड्या अंतरावर असलेल्या कारमधून त्यांनी पलायन केले. घटनेची माहिती मिळताच रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक मोतिराम निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी साक्री पोलिसात अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The robbers also made away with the jewels of the woman's niece; Saturday night thrills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.