विरोधकांच्या घोटाळ्यांचे कर्दनकाळ किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा

By मनीषा म्हात्रे | Published: March 4, 2023 09:16 AM2023-03-04T09:16:03+5:302023-03-04T09:16:27+5:30

७ लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

The scandal in Kirit Somaiya's office is the epitome of opposition scams | विरोधकांच्या घोटाळ्यांचे कर्दनकाळ किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा

विरोधकांच्या घोटाळ्यांचे कर्दनकाळ किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयातच श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, नवघर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

सोमय्या यांच्या निर्मलनगर, मुलुंड (पूर्व) कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कदम हे २०१७ पासून सोमय्या यांचे कार्यालयातील कामकाज पाहतात. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० मध्ये युवक प्रतिष्ठान या चॅरिटेबल ट्रस्टचे उद्घाटन केले होते. सोमय्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत. युवक प्रतिष्ठानतर्फे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका यांच्या मदतीने एचआयव्हीग्रस्त तसेच दिव्यांग लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

२०१७-१८ पासून संस्थेमार्फत ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत कानाचे मशीन (श्रवणयंत्र) ५०० रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करून मशीनचे वाटप होते. कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड (३७) आणि श्रीकांत रमेश गावित (३६) यांची प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बँकेत जमा केली जाते. 

 काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्लक आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा १ हजार ४७२ मशीनची जवळपास ७ लाख ३६ रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: The scandal in Kirit Somaiya's office is the epitome of opposition scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.