हॉटेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट, बनावट ग्राहक बनून पोलिसांनी केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 08:32 PM2022-05-01T20:32:45+5:302022-05-01T20:33:25+5:30

Sex Racket Busted : या संदर्भात वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.

The sex racket started in the hotel, the fake customer was exposed by the police | हॉटेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट, बनावट ग्राहक बनून पोलिसांनी केला पर्दाफाश

हॉटेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट, बनावट ग्राहक बनून पोलिसांनी केला पर्दाफाश

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी महिपालपूर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी महिलाआरोपींसह 14 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सात महिला, तीन ग्राहक, ब्रोकर, सर्व्हिस बॉय आणि हॉटेल मॅनेजर यांचाही समावेश आहे. पोलिसांनी हॉटेल सील केले आहे. या संदर्भात वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.

 
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वसंत कुंज पोलीस स्टेशनला शुक्रवारी महिपालपूर येथील हॉटेल स्वीट पॅलेसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच निरीक्षक संजीव मंडल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकाने महिपालपूर येथील हॉटेल स्वीट पॅलेसमध्ये बनावट ग्राहक पाठवले. टोळीचा म्होरक्या आणि व्यवस्थापकाने सात महिलांना ग्राहकांसमोर हजर केले. दोघांनी ग्राहकाकडून पैसे घेतले. डील निश्चित झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
 

तेथून अटक करण्यात आलेल्यांमध्ये 7 मुली, 3 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजरचा समावेश आहे. या कॉल गर्ल्सची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी कारही (कार क्रमांक DL6CP 5131)  पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यासोबतच वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येणारे हॉटेल सील करण्यात आले आहे. पोलिसांनी हॉटेलचे रजिस्टर जप्त करून हॉटेल सील केले. 

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...दिल्ली : महिपालपुर के होटल में चल रहे सेक्स रैकेट का भंडाफोड़, 7 लड़कियां, सरगना और मैनेजर सहित 14 लोग गिरफ्तार

 

जिच्यावर प्रेम केलं, तिच्यावर हल्ला करून भावाला घातल्या गोळ्या अन्...


चौकशीत हॉटेल स्वीट पॅलेसचा व्यवस्थापक सुरेंद्र ग्राहक मिळवण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायाला परवानगी देत ​​असल्याचे निष्पन्न झाले. पैसे न दिल्यास तो हॉटेलची रूम बुक करत नसे. सर्व्हिस बॉय आणि दलाल चालकासह महिलांना हॉटेलमध्ये आणायचे. गरिबीमुळे महिला या व्यवसायात गुंतल्याचे तपासात समोर आले आहे. हॉटेल व्यवस्थापकच्या (मॅनेजर) मागणीवरूनच या हॉटेलमध्ये आरोपी महिला पुरवत  असत. त्या बदल्यात हॉटेलकडून त्यांना कमिशन मिळत असे.

 

 

Web Title: The sex racket started in the hotel, the fake customer was exposed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.