सिद्धू मुसेवाला घरात घुसून मारायचे होते शूटर्सना; पोलिसांच्या वर्दीची केली होती खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:10 PM2022-06-21T14:10:09+5:302022-06-21T14:15:36+5:30

Siddhu Moosewala : आता अशी माहिती समोर आली आहे की, मुसेवाला यांची हत्या करणार्‍यांना घरात घुसून मारायचे होते.

The shooters wanted to kill Sidhu Musewala by breaking into the house; Police uniforms were purchased | सिद्धू मुसेवाला घरात घुसून मारायचे होते शूटर्सना; पोलिसांच्या वर्दीची केली होती खरेदी

सिद्धू मुसेवाला घरात घुसून मारायचे होते शूटर्सना; पोलिसांच्या वर्दीची केली होती खरेदी

Next

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येप्रकरणी एकापाठोपाठ एक अनेक खुलासे होत आहेत. पंजाब व्यतिरिक्त दिल्ली आणि महाराष्ट्राचे पोलीसही शूटर्सना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र दिल्लीपोलिसांना यश मिळाले आणि सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 3 शूटर्सना अटक केली.

आता अशी माहिती समोर आली आहे की, मुसेवाला यांची हत्या करणार्‍यांना घरात घुसून मारायचे होते. यासाठी शूटर्सनी पोलिसांची वर्दीही खरेदी केली होती. सिद्धू मुसेवालाजवळ नेहमीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे कॅनडामध्ये बसून गोल्डी ब्रारने प्रियव्रताला पोलिसांच्या गणवेशात गुन्हा करण्यास सांगितले होते. शूटर कट रचत असताना, संदीप केकरा याने 29 मे रोजी सिद्धूशिवाय सुरक्षा गृह सोडल्याची बातमी दिली.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सिद्धूला गोळ्या घालणाऱ्या प्रियव्रत फौजीचा सुगावा तुरुंगातील एका गुंडाकडून लागला. मुसेवालाच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांचे पथक सर्व तुरुंगात जाऊन गुंडांची चौकशी करत होते. यादरम्यान तुरुंगातील एका गुंडाने एक टीप दिली, अनेक दिवस त्याचा माग काढत दिल्ली पोलिसांचे पथक गुजरातमधील मुंद्रा येथे पोहोचले.


कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला सिद्धूला कोणत्याही किंमतीत मारायचेच होते. मुसेवाला यांच्या मृत्यूची सर्वत्र चर्चा व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. 28 वर्षीय सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी गायकाच्या हत्येची जबाबदारी घेतली. हत्येचे प्लॅनिंग खूप आधीपासून करण्यात आले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

विशेष म्हणजे 3 शूटर्सना अटक
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन शूटर्स दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी गुजरातमधील मुंद्रा येथून अटक केली. आरोपींना दिल्ली न्यायालयात हजर केले असता तिघांनाही ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ हातबॉम्ब, डिटोनेटर आणि ३६ राउंड पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. एके सीरिजची असॉल्ट रायफलही सापडली आहे.

Web Title: The shooters wanted to kill Sidhu Musewala by breaking into the house; Police uniforms were purchased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.