जमिनीच्या वादातून जावयानं चुलत सासऱ्याला गोळ्या झाडून ठार केलं

By दीपक शिंदे | Published: April 17, 2023 10:01 PM2023-04-17T22:01:21+5:302023-04-17T22:01:27+5:30

कोरेगावातील वाघोली येथील घटना

The son-in-law shot and killed the cousin-in-law due to a land dispute | जमिनीच्या वादातून जावयानं चुलत सासऱ्याला गोळ्या झाडून ठार केलं

जमिनीच्या वादातून जावयानं चुलत सासऱ्याला गोळ्या झाडून ठार केलं

googlenewsNext

पिंपोडे बुद्रुक : वाघोली, ता. कोरेगाव येथे जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्याला गोळ्या घातल्याची घटना घडली असून, सासरा सुनील शंकर भोईटे (वय ४८) याचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुनील भोईटे यांचे बंधू नामदेव भोईटे यांना दोन विवाहित मुली आहेत. मात्र, त्यांना मुलगा नाही. नामदेव यांचा जावई रवी यादव याने नामदेव यांच्या हिश्शाची जमीन विकली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे. तो दावा सुनील भोईटे यांनी दाखल केलेला आहे, अशीही माहिती मिळाली आहे.

यावरून नामदेव भोईटे यांचे जावई रवी यादव आणि सुनील भोईटे यांच्यात वादविवाद झाले होते. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नामदेव यांचे जावई रवी यादव व सुनील यादव या दोघांनी वाघोली येथे सुनील भोईटे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे निघाले असताना त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले. त्यावेळी भोईटे यांचा मुलगा माझ्या वडिलांना मारू नका म्हणून हात जोडून विनवण्या करीत होता. मात्र, तरीही रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात व छातीत तीन गोळ्या घातल्या. गोळ्या वर्मी लागल्याने सुनील भोईटे यांना तातडीने पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच भोईटे यांचा मृत्यू झाला.


संशयित घटनेनंतर पोलिसांत हजर

रवी यादव व सुनील यादव यांचे मूळगाव सोळशी, ता. कोरेगाव हे असून ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असतात. गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोघेही स्वतःहून वाठार पोलिस ठाण्यात हजर झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेसंदर्भात वाठार पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The son-in-law shot and killed the cousin-in-law due to a land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.