आईला वाचवण्यासाठी मुलाने लावली जीवाची बाजी, ना स्वतः वाचला, ना आईला वाचवता आले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:04 PM2022-03-06T20:04:43+5:302022-03-06T20:13:28+5:30

Big incident in Jaipur : एकुलत्या एका मुलाला गमावल्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. या दुःखद घटनेने गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

The son risked his life to save his mother, but he could not save himself, nor could he save his mother | आईला वाचवण्यासाठी मुलाने लावली जीवाची बाजी, ना स्वतः वाचला, ना आईला वाचवता आले

आईला वाचवण्यासाठी मुलाने लावली जीवाची बाजी, ना स्वतः वाचला, ना आईला वाचवता आले

googlenewsNext

जयपुर जिल्ह्यात आज एका मुलाने खरंच आईच्या दुधाचे उपकार फेडले. आईचा जीव वाचवण्यासाठी पोटच्या मुलाने स्वत:चा जीव धोक्यात घातला. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र दुर्दैवाने तरुण आपल्या आईला वाचवू शकला नाही, ना तोही वाचला. जयपूरमधील चाकसू भागात झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मायलेकाचा मृतदेह पोस्टमार्टमनंतर कुटुंबीयांकडे सोपवला आहे. एकुलत्या एका मुलाला गमावल्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. या दुःखद घटनेने गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना जयपूरमधील चाकसू भागातील आहे. आज सकाळी 10च्या सुमारास  गिर्राज (25) आपली आई सोना देवी (48) सह शेतात काम करीत होता. यादरम्यान सोना देवी पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीजवळ गेली. येथे पाणी भरताना तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.

खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या

त्यावेळी शेतात काम करणाऱ्या गिर्राजचं आईकडे लक्ष गेले. आईला विहिरीत पडताना पाहून गिर्राज थेट विहिरीच्या दिशेने धावला आणि त्याने लागलीच आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोघांनाही नशीबाने साथ दिली नाही. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर गावकरी विहिरीजवळ पोहोचले आणि त्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलावलं. त्यांनी दोघांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मुलाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आईसाठी थेट विहिरीत उडी घेतली.

Web Title: The son risked his life to save his mother, but he could not save himself, nor could he save his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.