Crime News : फ्लॅटमधून येत होता दुर्गंध, दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह काढला बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 01:29 PM2022-05-16T13:29:49+5:302022-05-16T13:35:16+5:30

Deadbody Found : दुर्गंधी येऊ लागल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

The stench was coming from the flat, the door was broken and the woman's body was taken out | Crime News : फ्लॅटमधून येत होता दुर्गंध, दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह काढला बाहेर 

Crime News : फ्लॅटमधून येत होता दुर्गंध, दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह काढला बाहेर 

googlenewsNext

हैदराबाद शहरातील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. फ्लॅटमध्ये एक 50 वर्षीय महिला आपल्या मुलासोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून शेजाऱ्यांनी दोघांनाही बाहेर पाहिले नव्हते. दुर्गंधी येऊ लागल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

महिलेचा मृतदेह कुजला असल्याने दुर्गंधी येत होती. त्याच फ्लॅटमध्ये महिलेसोबत तिला एक 22 वर्षांचा मुलगाही राहत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस महिलेच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. मुलाने खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना रचकोंडा झोनमधील मलकाजगिरी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून फ्लॅटचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 50 वर्षीय महिला विजया वाणी यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. याच फ्लॅटमध्ये विजयाचा 22 वर्षीय मुलगा साईही सापडला होता. साई मानसिकदृष्ट्या   विक्षिप्त असल्याचं सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी साईला हत्येच्या संशयावरून चौकशीसाठी प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले आहे.

साई त्याच फ्लॅटमध्ये होता. मात्र, त्याने या घटनेची माहिती इतर कोणाला किंवा पोलिसांना का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. साईनेच हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या महिलेच्या मृत्यूचे गूढ लवकरच उलगडेल, असा पोलिसांचा दावा आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह कुजलेला असल्याने तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा दिसत नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मतिमंद असल्याचे सांगण्यात येत असलेल्या साईची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

 

Web Title: The stench was coming from the flat, the door was broken and the woman's body was taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.