आत्महत्येची धमकी अन् तरुणीचे व्हिडीओ व्हायरल, इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 12:03 PM2023-06-21T12:03:38+5:302023-06-21T12:04:03+5:30

या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

The suicide threat and the video of the girl went viral, it was known on Instagram | आत्महत्येची धमकी अन् तरुणीचे व्हिडीओ व्हायरल, इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

आत्महत्येची धमकी अन् तरुणीचे व्हिडीओ व्हायरल, इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

googlenewsNext

मुंबई : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने कुर्ल्यातील अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवत तिच्यावर प्रेम करत असल्याचे भासवले. ही मुलगी जाळ्यात अडकताच, त्याने या मुलीशी अश्लील चाळे केले. तिला आत्महत्येची धमकी देत, तिच्याकडून नग्न व्हिडीओ आणि फोटो काढून घेत, शारीरिक संबंधांची मागणी केली. मुलीने नकार देताच, त्याने हे फोटो आणि व्हिडीओ मुलीच्या नातेवाईकाला पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ल्यात घडला आहे. या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 विनोबा भावेनगर पोलिस ठाण्यात शिफॉन खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ मे ते १९ जून या काळात ही घटना घडली आहे. या प्रकरणी विनयभंग, धमकावणे आणि बदनामी केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा नोंदविला आहे. पीडित मुलगी कुर्ला पश्चिम परिसरात राहते. यातील आरोपी शिफॉनने मुलीला इन्स्टाग्रामवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून तिच्याशी ओळख केली. तिच्याशी मैत्री झाल्यानंतर शिफॉनने तिला प्रपोज केले. तिच्यावर मनापासून प्रेम करत असल्याचे सांगून शिफॉनने तिला भेटायला बोलावले. मुलगी भेटायला आल्यानंतर शिफॉनने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत, शारीरिक संबंधांची मागणी केली.

नग्न फोटोची सक्ती 
शिफॉनने तिला एक चिठ्ठी लिहून आत्महत्येची धमकी देत, मुलीला नग्न व्हिडीओ आणि फोटो पाठविण्यास भाग पाडले. शिफॉन हा मुलीकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत होता. मुलीने त्याला नकार देत संपर्क तोडला. अखेर शिफॉनने मुलीने पाठविलेले फोटो आणि व्हिडीओ मुलीच्या नातेवाइकाला पाठवून तिची बदनामी केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे. यातील आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: The suicide threat and the video of the girl went viral, it was known on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.