टिळा लावून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकानं केलं भयानक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:45 PM2022-04-06T18:45:20+5:302022-04-06T18:45:47+5:30
Student beaten for wearing tilak : आरोपी शिक्षक निसार अहमद याला निलंबित करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील शाळेत चैत्र नवरात्रीनिमित्त विद्यार्थिनी टिळा लावून शाळेत गेली. याचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. मुलीच्या डोक्यावर, कपाळावर आणि शरीरावर जखमेच्या खुणा दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला. आरोपी शिक्षक निसार अहमद याला निलंबित करण्यात आले आहे.
राजौरीतल्या निसार अहमद नावाच्या शिक्षकाने आपल्या मुलीला मारहाण केल्याचा आरोप एका विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. मुलीच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण देखील दिसत आहेत. या घटनेमुळे मुलीच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असे मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे. या प्रकरणी शिक्षकावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हिंदू देव-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणं भोवलं, आरोपी प्राध्यापकास केले निलंबित
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, मुलगी चैत्र नवरात्री सुरु असल्याने कपाळावर टिळा लावून शाळेत पोहोचल्यावर शिक्षक निसार अहमद याने तिला बेदम मारहाण केली. या आरोपांची दखल घेत राजौरी येथील अतिरिक्त उपायुक्तांनी शिक्षकाला निलंबित केले आहे. सोबतच या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.