शिक्षिकेने चिमुरड्याला ठेवले बांधून, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:28 AM2023-06-18T06:28:11+5:302023-06-18T06:32:56+5:30

संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली असून याबाबत नाैपाडा पाेलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

The teacher keeps the little boy tied up, demanding action | शिक्षिकेने चिमुरड्याला ठेवले बांधून, कारवाईची मागणी

शिक्षिकेने चिमुरड्याला ठेवले बांधून, कारवाईची मागणी

googlenewsNext

ठाणे : पाचपाखाडीतील प्रतिष्ठित युरो किड्स या शिशुवर्गाच्या शाळेतील शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुरड्याला ओढणीने बांधल्याचा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा चिमुरड्याचे वडील दिनेश शेट्टीगर यांनी केला आहे. तसेच शिक्षिकेने पुन्हा बांधण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 
संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली असून याबाबत नाैपाडा पाेलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. शेट्टीगर यांचे हे पत्र शनिवारी सोशल मीडियावरही व्हायरल झाले. या पत्रात त्यांनी आपल्या आहान दिनेश शेट्टीगर या मुलावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली. पाचपाखाडीतील या प्ले स्कूलमध्ये १६ जून रोजी दुपारी २ वाजता आहानची आई त्याला घेण्यासाठी शाळेत गेली. तेव्हा त्याच्या वागण्यात बदल झालेला दिसला. शिक्षिका प्राजक्ता पठारे यांनी त्याला बांधून ठेवल्याचे सांगितले. त्या शिक्षिका ओरडतात. त्यामुळे शाळेतच जायचे नाही, असा पवित्रा आहान याने घेतल्याने शेट्टीगर यांना धक्का बसला. शेट्टीगर यांनी शाळेच्या प्रमुख निवेदिता मुखर्जी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मुलाला बांधले नव्हते तर केवळ हात पकडून ठेवले होते, असा दावा केला. शेट्टीगर यांनी सीसीटीव्ही चित्रण पाहिले. तेव्हा शिक्षिकेने आहानला हाताने फटका मारल्याचे तसेच दोनदा ओढणीने बांधल्याचे दिसले. यासंदर्भात शाळेच्या प्रभारी निवेदिता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
या शिक्षिकेवर कारवाईचे आश्वासन निवेदिता यांनी दिल्याचेही शेट्टीगर यांनी सांगितले.

Web Title: The teacher keeps the little boy tied up, demanding action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.