परीक्षेत कॉपी करून दिली नसल्याच्या रागाने शिक्षकांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 03:18 PM2023-09-22T15:18:06+5:302023-09-22T15:18:38+5:30

याप्रकरणी पर्यवेक्षक शिक्षिकेने शिवीगाळ करणाऱ्या इसमा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

The teachers were abused and threatened with death because they were not copied in the exam! | परीक्षेत कॉपी करून दिली नसल्याच्या रागाने शिक्षकांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी!

परीक्षेत कॉपी करून दिली नसल्याच्या रागाने शिक्षकांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी!

googlenewsNext

भिवंडी : तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विषयाच्या पेपर लिहिताना परीक्षार्थी विद्यार्थ्याला कॉपी करून न दिल्याने विद्यार्थ्यांने महाविद्यालया बाहेर जाऊन आपल्या सहकाऱ्याला महाविद्यालयात बोलावून त्या सहकार्याने पर्यवेक्षक शिक्षिकेसह,सुपरवायझर व महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्रचार्यांना शिवीगाळ व जीवे ठार मारल्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना देशातील प्रसिद्ध बी.एन.एन महाविद्यालयात गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक शिक्षिकेने शिवीगाळ करणाऱ्या इसमा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
           
दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. बिएनएन महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विषयाचा पेपर सुरु असतांना पेपर लिहीत असलेला रुपेश बनसोडे हा वारंवार कॉपी करत होता त्याला समज दिल्यानंतरही तो न ऐकता कॉपी करत राहिला. या प्रकरणी पर्यवेक्षिका प्रतीक्षा प्रेमनाथ मिटकर वय २३ वर्ष यांनी पुन्हा कॉपी केली तर प्राचार्यांना सांगेन असे बोलल्यानंतर रुपेश यास राग आल्याने तो पेपर सोडून परीक्षा केंद्राच्या बाहेर गेला व त्याने आपला साथीदार दादू गायकवाड याला याबाबत सांगितले. त्यांनतर दादू गायकवाड याने परीक्षा हॉलमध्ये येऊन पर्यवेक्षिका प्रतीक्षा यांना शिवीगाळ व आरडाओरड केली. 

यावेळी परीक्षा हॉलमध्ये महाविद्यालयाचे इतर शिक्षक व सुपरवायझर तसेच प्राचार्य वाघ सर व उपप्राचार्य सुवर्णा रावळ या आल्या असता त्यांनाही शिवीगाळ केली, तर उपप्राचार्य रावळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी पर्यवेक्षिका प्रतीक्षा मिटकर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात आरडाओरड व शिवीगाळ तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दादू गायकवाड या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The teachers were abused and threatened with death because they were not copied in the exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.